जळगाव (प्रतिनिधी) – आज मुक्ताई महिला बहुउद्देशीय संस्था, जनमत प्रतिष्ठान व श्रीमंत शिवतेज प्रतिष्ठान कडून सुशिक्षित बेरोजगारांसाठी प्रेम नगर शेजारील पेट्रोल पंपाच्या बाजूला नाश्ताची गाडी सुरू करण्यात आली आहे.

असा प्रकल्प जळगाव मध्ये प्रत्येक भागात सुरू करण्याचा प्रस्ताव आहे, असे नगरसेविका नीताताई सोनवणे यांनी सांगितले, त्यावेळेस अध्यक्ष नीताताई मंगलसिंग सोनवणे, विश्व हिंदू परिषदेचे महामंत्री व शिवतेज प्रतिष्ठान चे दीपक दाभाडे,, दिषा स्पर्धा परीक्षेचे संचालक वासुदेव पाटील विजय लुल्ल्हें सर, क्रीडाशिक्षक प्रवीण पाटील ,शाहू ब्रिगेडचे कायदेशीर सल्लागार एडवोकेट हेमंत दाभाडे , जनमत प्रतिष्ठानचे अध्यक्ष पंकज नाले, प्रशांत सुर्वे, हिंदुमहासभेचे राज्यमंत्री गोविंद तिवारी, जयेश चौधरी, हर्षल पाटील यांची उपस्थिती होती.







