मुंबईच्या कस्तुरबा रुग्णालयात आता तीसरा बळी
मुंबई – महाराष्ट्रातील कोरोना रुग्णांच्या संख्येत झपाट्याने वाढ होत आहे. मुंबई आणि पुण्यात गेल्या काही तासांमध्ये कोरोनाचे नवे रुग्ण समोर आले आहेत. मुंबई व पुणे या शहरातून आता 14 नवीन रुग्णांचा आकडा वाढला आहे.
आज 14 रुग्णांनाचे रिपोर्ट पॉझिटिव्ह आले आहे. त्यामुळे करोना च्या रुग्णांनाचा आकडा राज्यात काल 75 वरुन 89 वर आला आहे. यामुळे राज्यांची परिस्थिती बिकट होतांना दिसत आहे. भारतात करोनाचे जास्त रुग्ण हे महाराष्ट्रात आहे. यामुळे नागरिकांनी घरा बाहेर पडू नये असे आवाहन करण्यात आले आहे.
संपूर्ण देशात कोरोनावर मात करण्यासाठी काल जनता कर्फ्यू लागू करण्यात आला होता तरी सुध्दा राज्यात 14 रुग्णांनाची वाढ झाली आहे. असे डॉ तात्याराव लहाने यांनी सांगितले आहे. देशात 415 आकडा आता करोनाने पार केला आहे. यात करोनाने आतापर्यंत तीन रुग्णांनाचा मृत्यू झाला आहे.
राज्यात करानोचा तीसरा बळी
मुंबईमध्ये कोरोनाचा तीसरा बळी गेला 68 वयाचा हा रुग्ण व्हेठीलेटर कस्तुरबा रुग्णांनालया मध्ये उपचार घेत होता. एका 68 वर्षीय रुग्णाचा कोरोनामुळे मृत्यू झाला.
कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या महाराष्ट्रामध्ये वाढली असून ती आता 89 वर पोहोचली आहे. हे आकडे काही तासांमध्ये वाढले असल्याची माहिती समोर आली आहे. आता संपूर्ण देशात रुग्णांचा आकडा 415 वर पोहोचला आहे. महाराष्ट्रामध्ये कोरोना रुग्णांची संख्या जास्त आहे. एका दिवसात कोरोनाचे 14 नवे रुग्ण समोर आले आहेत.