• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

 

 

 

 

 

कोरोनाने एसटीचे चाक रोखले; अत्यावश्यक सेवा देण्यासाठी ५०० बसेस धावणार

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
March 23, 2020
in महाराष्ट्र
0

मुंबई : कोरोना विषाणूचा प्रसार रोखण्यासाठी राज्यात कलम १४४ लागू केले आहे. कोरोनाचा प्रादुर्भाव वाढू नये, यासाठी एसटी सेवा बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानुसार, सर्वसामान्य प्रवासासाठी ३१ मार्चपर्यंत एसटी महामंडळाकडून एकही बस सोडली जाणार नाही, पण अत्यावश्यक सेवेसाठी एसटीच्या ५०० बसेस सोडल्या जाणार आहेत, अशी माहिती परिवहनमंत्री अनिल परब यांनी दिली.
रेल्वे मंडळाने देशातील सर्व उपनगरीय लोकल, लांब पल्ल्याच्या एक्स्प्रेस ३१ मार्चपर्यंत बंद करण्याचा निर्णय घेतला.

त्याचबरोबर, एसटी महामंडळानेही बस बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. सर्वसामान्य प्रवाशांसाठी धावणारी एसटी बंद असली, तरी शासकीय अधिकारी, कर्मचारी आणि अत्यावश्यक सेवेसाठी ५०० एसटीच्या बसेस धावणार आहेत. कोरोनामुळे एसटीच्या ११ मार्च ते २० मार्च या दरम्यान राज्यभरातील ९३ हजार १८० फेऱ्या रद्द केल्या आहेत. त्यामुळे एसटीला १४ कोटी ४३ लाख रुपयांचे उत्पन्न बुडाले आहे.

अत्यावश्यक सेवेसाठी एसटीची मदते
सरकारने अत्यावश्यक सेवा देणाऱ्या व्यक्तींसाठी वाहतूक करण्याची जबाबदारी एसटी महामंडळ आणि बेस्टवर टाकली आहे. त्यानुसार, पनवेल, पालघर, आसनगाव, विरार, कल्याण, बदलापूर या रेल्वे स्थानकांहून मुंबईतील बोरीवली, वाशी, दादर व ठाणे (खोपट) या प्रमुख रेल्वे स्थानकांपर्यंत (तेथून पुढे बेस्ट बसेसद्वारे शहरांतर्गत वाहतूक होईल.) केवळ अत्यावश्यक सेवा देणाऱ्या लोकांची ने-आण करण्यासाठी एसटीच्या बसेस दर पाच मिनिटाला याप्रमाणे सुरू ठेवण्यात आलेल्या आहेत.
पनवेल-वाशी, पनवेल-दादर, पालघर-बोरीवली, विरार-बोरीवली, वाशी-दादर, आसनगाव-ठाणे, कल्याण-ठाणे, कल्याण-दादर, बदलापूर-ठाणे, नालासोपारा-बोरीवली या मार्गांवर अत्यावश्यक सेवा देण्यासाठी एसटी बसेस धावतील. या व्यतिरिक्त उर्वरित महाराष्ट्रातील सर्व एसटी बसेस राज्य शासनाने दिलेल्या निर्देशानुसार आज रात्रीपासून पुढील आदेश येईपर्यंत बंद होणार आहेत.

बेस्टच्या खास सेवा
मुंबई : कोरोनाला आळा घालण्यासाठी आता मुंबई ३१ मार्चपर्यंत बंद असणार आहे. या काळात मुंबईची लोकल पूर्णत: बंद ठेवण्यात येणार आहे. मात्र, मुंबईला अत्यावश्यक सेवा देत असलेल्या कर्मचारी वर्गास कामावर हजर राहता यावे, यासाठी बेस्ट सरसावली आहे. संपूर्ण काळात बेस्ट वाशी, बोरीवली, गोराई डेपो, ओशिवरा डेपो, गोरेगाव, दहिसर, दिंडोशी, शिवाजीनगर, शिवडी, बॅकबे डेपो, आगरकर चौक आणि मुलुंड येथून बेस्ट सेवा देणार आहे. काही अडचण असल्यास १८००२२७५५० या टोल फ्री नंबरवर संपर्क साधावा. दरम्यान, रविवारी बेस्टकडून मुंबईच्या रस्त्यांवर १ हजार २५३ बसेस चालविण्यात आल्या, अशी माहिती बेस्टने दिली.


 

 

Previous Post

रावेरात दोन गटात तुफान दगडफेक; पोलीसांचे प्रसंगावधान

Next Post

राज्यात करोनाचे 89 रुग्ण ; एकादिवसात 14 रुग्णांनाची वाढ 

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post

राज्यात करोनाचे 89 रुग्ण ; एकादिवसात 14 रुग्णांनाची वाढ 

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

एरंडोलमध्ये अवैध सावकारीप्रकरणी तिघांविरुद्ध गुन्हा दाखल
क्राईम

एरंडोलमध्ये अवैध सावकारीप्रकरणी तिघांविरुद्ध गुन्हा दाखल

October 9, 2026
रावेरच्या भगवती नगरात घरफोडी; सोन्याचे दागिने व रोकड लंपास
क्राईम

रावेरच्या भगवती नगरात घरफोडी; सोन्याचे दागिने व रोकड लंपास

October 9, 2026
भोकरखेडजवळ अज्ञात वाहनाच्या धडकेत दुचाकीस्वार गंभीर जखमी
क्राईम

भोकरखेडजवळ अज्ञात वाहनाच्या धडकेत दुचाकीस्वार गंभीर जखमी

October 9, 2026
तापी नदीत साखळीने पाय बांधलेल्या अवस्थेत तरुण दाम्पत्याचे मृतदेह आढळले; परिसरात खळबळ
क्राईम

तापी नदीत साखळीने पाय बांधलेल्या अवस्थेत तरुण दाम्पत्याचे मृतदेह आढळले; परिसरात खळबळ

October 9, 2026

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

एरंडोलमध्ये अवैध सावकारीप्रकरणी तिघांविरुद्ध गुन्हा दाखल

एरंडोलमध्ये अवैध सावकारीप्रकरणी तिघांविरुद्ध गुन्हा दाखल

October 9, 2026
रावेरच्या भगवती नगरात घरफोडी; सोन्याचे दागिने व रोकड लंपास

रावेरच्या भगवती नगरात घरफोडी; सोन्याचे दागिने व रोकड लंपास

October 9, 2026
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon