डॉ. संजीव पाटील यांचा सदस्यत्वाचा राजीनामा

जळगाव (प्रतिनिधी) – माजी मंत्री एकनाथराव खडसे यांच्या राजीनाम्यानंतर भाजपाला खिंडार पडायला सुरुवात झाली आहे. चाळीसगाव येथील माजी परदेश सरचिटणीस कैलास सूर्यवंशी नंतर भाजपा माजी जिल्हाध्यक्ष डॉ संजीव पाटील यांनी देखील प्रदेशाध्यक्षांकडे पक्षाच्या सदस्यत्वाचा राजीनामा पाठविला आहे.
राजीनामा पत्रात यांनी म्हटले आहे की, नाथाभाऊ माझे नेते आहेत यांचा संघर्ष हा माझ्यासाठी नेहमीच प्रेरणादायी ठरला आहे. त्यांच्या सन्मानार्थ मी डॉ संजीव कृष्णाराव पाटील भारतीय जनता पार्टीच्या प्राथमिक सदस्यत्वाचा राजीनामा देत आहे. असे त्यानी पत्रात म्हटले आहे.







