अमळनेर (प्रतिनिधी) अमळनेर येथील सुवर्णकार फेडरेशन ने नाशिक येथील सुवर्ण व्यापारीचा हैद्राबाद पोलीसांच्या कस्टडीत झालेल्या मृत्यूची सखोल चौकशी करून सदोष गुन्हा दाखल करण्याची मागणी साठी दिले निवेदन.
सविस्तर माहिती अशी की, नाशिक येथील सुवर्ण व्यापारी विजय बुधूशेठ बिरारी (सोनार) यांना दि 25 फेब्रुवारी2020 रोजी हैदराबाद पोलीसांनी स्थानिक पोलीसांना कुठलीही पूर्व सूचना नदेता चोरीचे सोनं घेतल्याचा आरोप ठेवून ताब्यात घेतले होते, त्यात त्यांचा संशयास्पद मृत्यू झाला. ही घटना हत्या की आत्महत्या? हे संशयास्पद असल्याने सदर मुत्यूची निष्पक्ष चौकशी करून हैद्राबाद पोलिसांविरुद्ध सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करणे या बाबत निवेदन नायबतहसीलदार आर.एस.चौधरी व सोा.पो. नि. प्रकाश सदगीरे यांना अमळनेर महा.राज्य सराफ व सुवर्णकार फेडरेशन च्या वतीने देण्यात आले.निवेदनात योग्य ती कार्यवाही होऊन न्याय मिळावा आम्ही सर्व सराफ व सुवर्णकार बांधव कै. श्री. विजय बुधूशेठ बिरारी (सोनार) यांचे संशयास्पद झालेल्या मुत्यूचा व या सम्पुर्ण घटनेचा तीव्र निषेध करीत आहोत, अश्या आशयाची मागणी केलेली आहे.
निवेदन देते समयी मुकुंद विसपुते व दि.सोनार, राजेंद्र वर्मा, मदन सराफ, संदिप सराफ, मोहन व प्रमोद भामरे, अतुल सोनी, निलेश देवपुरकर, विनोद,रवि, राजेश वर्मा, कुशल, कपिल, प्रमोद विसपुते , विनोद थोरात व अहिर सुवर्णकार युनियन अमळनेर , सुवर्णकार कारागीर सेना यांच्या वतीने आदी उपस्थित होते.