पाचोरा, बोदवड, धरणगाव,पारोळा कोरोनामुक्तीकडे
जळगाव (प्रतिनिधी) – आज रविवारी १८ ऑक्टोबर रोजी करोनाबाधित रुग्णांची संख्या जिल्ह्यात ६० आढळली असुन दिवसभरात ३ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. आता पर्यंत जिल्ह्यात एकुण कोरोना बाधित रुग्णांची संख्या ५१८८९ झाली आहे. त्यापैकी ४८७६६ रुग्णांनी कोरोनावर मात केली आतापर्यंत १२४१ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. सध्या १८८२ रुग्ण उपचार घेत आहेत.दिवसभरात बरे होणाऱ्यांची संख्या ६० झाली आहे. तसेच जिल्ह्यात ९३.९८ टक्के रुग्ण बरे झाले आहेत. मृत्युदर २. ३९ टक्क्यांवर आलेला आहे.
पॉझिटिव्ह आढळलेल्या व्यक्तींमध्ये जळगाव शहरातील ६, जळगाव ग्रामीण ००, भुसावळ ३, अमळनेर १२, चोपडा १,पाचोरा ०० , भडगाव ४, धरणगाव १, यावल ३, एरंडोल ००, जामनेर १२, रावेर ६, पारोळा ४, चाळीसगाव ४, मुक्ताईनगर ३, बोदवड १, इतर जिल्ह्यातील ०० आहे.१८८२ रुग्णांवर उपचार सुरु आहेत. अशी माहिती जिल्हा प्रशासनाच्यावतीने देण्यात आली आहे. दिवसेंदिवस कोरोना बाधित रूग्णांची संख्या गेल्या आठवड्यापासून घट्त असल्याने नागरिकांसह प्रशासनाला दिलासा मिळाला आहे. जिल्ह्यात सध्या सर्वाधिक जळगाव शहरात ९८४ रुग्ण उपचार घेत असून दोन नंबरला भुसावळला २२४ रुग्ण उपचार घेत आहे. तसेच पाचोरा तालुक्यात फक्त ८ रुग्ण, धरणगाव तालुक्यात १४ रुग्ण, बोदवड तालुक्यात १६ रुग्ण,पारोळा तालुक्यात २१ रुग्ण उपचार घेत असून हे तालुके कोरोनमुक्तीच्या अंतिम टप्प्यात आहे.