गणेशपूर ता.चाळीसगाव (प्रतिनिधी) – येथील रहिवासी असलेले अल्यभूधारक शेतकरी सुनील भिका पाटील (वय – ३८) या तरुण शेतकऱ्यांने जास्त पावसाने नापीकी झालेले पिक शेतीचे कर्ज, नातेवाईक,मित्र परिवाराकडून घेतलेले हात ऊसणवारी पैसे व पत्नीच्या दीर्घ आजारांच्या उपचाराच्या खर्चाला उबगून या तरुण शेतकऱ्यांने जीवनयात्रा संपवली त्यांच्या या घटनेने व्यक्त केले जात आहे.
याबाबत सविस्तर वृत्त असे की गणेशपूर येथील अल्पभूधारक शेतकरी सुनील भिका पाटील(वय ३८) या शेतकऱ्यांने शेतातील नापीक पिक व कर्जापोटी नातेवाईक,मित्र परिवाराची हात ऊसणवारी पैसे व पत्नीच्या दीर्घ आजाराच्या उपचारासाठी लागणारा खर्च व चाळीसगाव येथे खाजगी रूग्णालयात उपचार चालू होते दवाखान्यातील बील देण्यासाठी हातात पैसे नसल्याने ते चिंतेत होते मी दवाखान्याचे बील भरण्यासाठी पैसे कुठूनही घेऊन येतों असे पत्नीला सांगून ते दि.१६ रोजी दवाखान्यात गेले तर ते परत आलेच नाही त्यांनी औरंगाबाद – धुळे बायपास रेल्वे पुलाजवळ दि.१७ रोजी रात्री ३ वाजेच्या पुढे रेल्वे खाली स्वतः झोकून आत्महत्या करून जीवनयात्रा संपवली त्यांच्या या मृत्यूने हळहळ व्यक्त केली जात आहे त्यांच्या मागे पत्नी,दोन लहान मुले आहेत.








