पारोळा (प्रतिनिधी) – पारोळा तालुका मंडप आणि केटरर्स तर्फे आज दिनांक १८ रोजी भाटेवाडी येथे कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
सदर कार्यक्रमाला ऑल महाराष्ट्र टेंट डीलक्स अँड वेलफेअर असोसिएशनचे उपाध्यक्ष तथा टेंट अँड डेकोरेटर्स मंडळ चे जळगाव जिल्हाध्यक्ष प्रदीप श्रीश्रीमाळ, उपाध्यक्ष प्रितेश चोरडिया, कोषाध्यक्ष अजय अग्रवाल , सल्लागार-शंकरजी दहारा, लाईटनिंग अध्यक्ष -संतोष दफ्तरी इत्यादी प्रमुख पाहुणे म्ह्णून उपस्थित होते.
कार्यक्रमाच्या सुरवाता अगोदर कोरोना मध्ये मयत व्यक्तीना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली .
कोरोनामुळे मंडप व्यावसायिक, छोटे व्यापारी , आचारी, मजूर यांच्या वर जी उपासमारीची वेळ आली आहे, या व्यथा शासन दरबारी मांडून न्याय मिळवून द्यावा असे मत ओंकार भावसार यांनी मांडले.
तर प्रमुख पाहुणे प्रदीप श्रीश्रीमाळ म्हणाले की-आम्ही शासनाचे कोरोना संबंधी सर्व नियमांची काटेकोरपने बजावणी करणार असून आम्हाला लग्नसमारंभात ५०० लोकांची परवानगी द्यावी या मागणी सह विविध मागण्या शासन दरबारी मागत असून शासनाने आमच्या मागण्या न केल्यास येत्या 2 नोव्हेंबर ला राज्यभरात एकदिवसीय लाक्षणिक उपोषण छेडण्याच्या इशारा त्यांनी दिला तर वेळ पडल्यास जेल भरो आंदोलन करण्यास तयारी असून असल्याचे ही त्यांनी सांगितले.
एकत्र येण्याचा सल्ला- आपल्या समस्या व मागण्या ह्या शासन दरबारी मांडण्याच्या मार्ग म्हणजे असोसिएशन, यासाठी तालुक्यातील सर्व मंडपधारक, केटरर्स यांनी एकत्र येऊन असोसिएशनची स्थापना करण्याचे आवाहन ही त्यांनी केले.
यावेळी कार्यक्रमात प्रमुख पाहुण्यांसह शहरातील मंडप धारक बापू कुंभार, साळी भाऊ, नाना शिंपी, बंडभाऊ शिंपी, ओंकार भावसार, छोटू लोहार, संजय चौधरी ,यांच्यासह शहर आणि तालुक्यातील मंडप व्यावसायिक, केटरर्स व पत्रकार उपस्थित होते.
जेष्ठ पत्रकार- अभय पाटील यांचा सत्कार – कोरोना काळात मदतनिधी जमा करून रोज तब्बल १००० लोकांना जेवण्याची व्यवस्था उपलब्ध करून दिल्याबद्दल कार्यक्रमात अभय पाटील यांचा सत्कार करण्यात आला.








