जळगाव (प्रतिनिधी) – येथील जामनेर तालुका युवा शारीरिक शिक्षण व क्रीडा शिक्षक महासंघाची सभा नुकतीच संपन्न झाली या सभेत जामनेर तालुका शारीरिक शिक्षण व क्रीडा शिक्षक महासंघ संलग्न असलेल्या जामनेर तालुका युवा शारीरिक शिक्षण व क्रीडा शिक्षक महासंघाची कार्यकारिणी निवड करण्यात आली.
अध्यक्षपदी प्रा.आसिफ खान तर सचिवपदी प्रा.समीर घोडेस्वार यांची व कार्यकारिणी सर्वानुमते निवड करण्यात आली तालुका युवा कार्यक्रम याप्रमाणे- अध्यक्ष प्रा.आसिफ खान अजमल खान (जि.प.उर्दू शाळा,फत्तेपुर ), उपाध्यक्ष- दीपक कृष्णा चौधरी,( नारायण आनंदा बोरसे, शहापूर), कार्याध्यक्ष- नरेंद्र प्रल्हाद पाटील (श्रीलॉर्ड गणेशा स्कूल, जामनेर), सचिव-प्रा. समीर विष्णू घोडेस्वार,(इंदिराबाई ललवाणी माध्य.व उच्च माध्यमिक विद्या. जामनेरपुरा) सहसचिव- सुनिल तुकाराम मोझे( महाराणा प्रताप माध्य. देऊळगांव,गुजरी), महेश संभाजी ठाकरे (जनता हायस्कूल, नेरी), खजिनदार- विलास निंबा पाटील (ज्ञानगंगा माध्य. विद्यालय,जामनेर) सल्लागार- प्रवीण धनराज पाटील (दौलत मोतीराम जगताप माध्य.विद्या, केकतनिंभोरा), सदस्य- प्रवीण तुकाराम पाटील (जनता माध्य. व उच्च माध्य.,नेरी), सदस्य- गजानन दामू कचरे( इंदिराबाई ललवाणी माध्य.विद्या., जामनेरपुरा) महिला सदस्य- सौ.किर्ती रमेश पाटील (इंदिराबाई ललवाणी माध्य. विद्या., जामनेरपुरा) यांची निवड करण्यात आली.
या नियुक्ती बद्दल जळगाव जिल्हा शारीरिक शिक्षण व क्रीडा शिक्षक महासंघाचे अध्यक्ष डॉ.प्रदीप तळवलकर, महाराष्ट्र राज्य शारीरिक शिक्षण व क्रीडा शिक्षक महासंघाचे वरिष्ठ सचिव राजेश जाधव, जामनेर तालुका क्रीडा सचिव जी.सी.पाटील यांनी अभिनंदन केले.








