वडती ता.चोपडा (प्रतिनिधी) – विजांचा जोरदार कडकडाट होऊन पावसा सोबत अचानक अंगावर वीज पडल्याने नगर पालिकेच्या कंत्राटी कामगाराचा मृत्यू झाल्याची दुर्घटना शनिवारी दुपारी ४:३० वाजता चोपडा शहरातील रामपूरा भागातील नगरपालिकेच्या
गांडूळ प्रकल्पाजवळ घडली. या घटने संदर्भात शहरात सर्वत्र हळहळ व्यक्त करण्यात येत आहे. शनिवारी ंं दुपारी ४ वाजेच्या सुमारास आकाशात विजांचा प्रचंड कडकडाट होऊन पावसाच्या सरी कोसळून अचानक अंगावर वीज पडल्याने
दीपक भागवत पारधी (वय-२९) याचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना रामपूरा भागातील गांडूळ प्रकल्पा जवळ घडली.नगरपालिकेत कंत्राटी कामगार म्हणून दीपक पारधी कामावर होता.
घटनेनंतर त्याला मयत अवस्थेत उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले.वैद्यकीय अधिकारी डॉ.तृप्ती पाटील यांच्या खबरीवरून शहर पोलीस स्टेशनला अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.दरम्यान नगरपालिकेचे गटनेते जीवन चौधरी,उपनगराध्यक्ष भुपेंद्र गुजराथी,माजी उपनगराध्यक्ष हुसेनखा पठाण,
नगरसेवक रमेश शिंदे,माजी नगरसेवक मंगल ठाकरे यांनी उपजिल्हा रुग्णालयात दाखल होवून घटनेची माहिती घेऊन नातेवाईकांचे सांत्वन केले.
मयत कंत्राटी कामगार दीपक भागवत पारधी याच्या पश्चात पत्नी,२ मुली,आई,वडील,२ भाऊ,१ बहीण असा परिवार आहे








