जळगाव (प्रतिनिधी) – जळगाव ते आसोदा दरम्यान सुमारे ४० ते ४५ वर्षीय अनोळखी इसमाचा धावत्या रेल्वेखाली येवून मृत्यू झाल्याची घटना बुधवारी सायंकाळी ८ वाजेच्या सुमारास घडली. याप्रकरणी तालुका पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.
अधिक माहिती अशी की, शहरातील जळगाव रेल्वे स्थानक ते आसोदा दरम्यान खांबा क्रमांक ४२२/२० ते २२ दरम्यान अप लाईनवर धावणार्या रेल्वेखाली येवून ४० ते ४५ वर्षीय एका अनोळखी पुरुषाचा मृत्यू झाल्याची घटना बुधवारी रात्री ८ वाजेच्या सुमारास घडली. मृता रंग सावळा असून उंची ५ फुट ५ इंच आहे. तसेच त्यांच्या अंगात पांढरा शर्ट व निळ्या रंगाची पॅन्ट घातली असून उजव्या हातावर ‘मॉं की ममता’ असे नाव गोंदलेले आहे. या घटनेची माहिती उपस्टेशन प्रबंधक व्ही. एस. कुळकर्णी यांनी दिली असून याप्रकरणी तालुका पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.
प्रसार भारती लवकरच पीटीआय आणि यूएनआयसह सर्वच वृत्तसंस्थांकडून प्रस्ताव मागवण्याची प्रक्रिया सुरू करेल. या वर्षी जून महिन्यात वृत्तसंस्थांद्वारे कथित राष्ट्रविरोधी वृत्त प्रसारित केल्यामुळे हे संबंध संपुष्टात आणल्याचे सांगत प्रसार भारतीने हे पत्र धाडल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.
पीटीआयने चीनी राजदूत सून विडोंग यांती एक मुलाखत घेतली होती. या मुलाखतीत विडोंग यांनी भारत-चीन तणावाला भारताला दोषी पकडले होते. जूनमध्ये बोर्डाची बैठक होण्यापूर्वी पीटीआयला हे पत्र पाठवण्यात आल्याचे सूत्रांनी सांगितले. या पत्रात पीटीआयच्या कथित राष्ट्रविरोधी वृत्तांकनाबाबत नाराजी व्यक्त करण्यात आली होती. पीटीआयचा संपादकीय दृष्टीकोन ठीक नसल्याचे प्रसार भारतीने पत्रात स्पष्ट कल्याचे समजते.