जळगाव (प्रतिनिधी) – साप म्हटला की चांगल्या चांगल्या च्या अंगावर काटा येतो . असाच अंगावर काटा येणारी घटना काल रात्री सदोबा नगरातील मिराई पार्क आपारमेंटच्या खाली पहावयास मिळाली. याठिकाणी घोणस जातीचा अतिविषारी साप आढळून आल्याने एकच खळबळ उडाली.
सविस्तर वृत्त असे की, 14 रोजी रात्री 10 ते 10.15 दरम्यान मीराई पार्क अपार्टमेंटमधील रहिवासी निलेश पाटील यांनी खिडकीतून अजगर सारखा जाड सर्प अपार्टमेंटमध्ये शिरल्याचे पहिले. त्यांनी आरडाओरडा केल्याने आजुबाजूचे रहिवाशी गोळा झाले व यावेळी सर्पमित्र यांना फोनद्वारे पाचारण करण्यात आले. रहिवाशी यांनी अजगर असल्याचे सांगितले. अपरमेंटच्या खाली जुन्या वस्तू व अडचणीच्या ठिकाणी काहीतरी आवाज येत असल्याचे दिसून आले व त्या ठिकाणी भंगार व रिकाम्या वस्तू अडचण बाजूला करण्यात आले अशाच वेळी फुस फुस असा जोरदार आवाज येऊ लागला व सर्प मित्र भूपेंद्र तळेले यांनी हा घोणस जातीच्या सापाचा आवाज असल्याचे सांगितले तळेले यांनी अनेक परिश्रम करून त्या सर्पाला सर्प काठीच्या साहाय्याने व्यवस्थितरीत्या सापाला जिवंत पकडण्यात यश आल्याने यावेळी नागरिकांनी सुटकेचा श्वास सोडला.
घोणस हा सर्प विषारी सापांचा प्रजाती मधील सर्वात घातक साप असून हा जळगाव जिल्ह्यातील जंगलांमध्ये आढळतो. तसेच हा साप याठिकाणी आढळून येणार हे आश्चर्य असून त्याचबरोबर या सापाची लांबी साडेचार फुटापर्यंत होती. हा साप चावल्यानंतर वेळीच उपचार न झाल्यास माणसाचा मृत्यू होऊ शकतो किंवा आयुष्यभरासाठी अपंगत्व देखील होऊ शकते. अशी माहिती सर्पमित्र भूपेंद्र तळेले यांनी देशोन्नती शी बोलताना दिली.