पुस्तक भिशी उपक्रमाच्या उद्घाटन प्रसंगी

शशिकांत हिंगोणेकर यांचे प्रतिपादन
जळगाव (प्रतिनिधी) – ” वाचन संस्कृती जोपासण्यासाठी प्रत्येक घरात ग्रंथालय असणे अत्यावश्यक आहे . ” असे प्रतिपादन निवृत्त शिक्षण उपसंचालक शशिकांत हिंगोणेकर यांनी केले . डॉ . ए .पी.जे. अब्दुल कलाम यांच्या जयंतीदिनानिमित्त जळगाव शहरात प्रथमच पुस्तक भिशी या अभिनव उपक्रमाचा प्रारंभ झाला . पुस्तक भिशीच्या उद्घाटन प्रसंगी मार्गदर्शन करतांना हिंगोणेकर अध्यक्ष स्थानावरून बोलत होते .
अथर्व पब्लिकेशनच्या कार्यालयात दि. १५ ऑक्टोबर रोजी कार्यक्रम संपन्न प्रमुख अतिथी अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे जिल्हा कार्याध्यक्ष दिगंबर कट्यारे , उपक्रमाचे समन्वयक विजय लुल्हे, युवराज माळी यांच्या उपस्थितीत संपन्न झाला. प्रस्तावनेत समन्वयक विजय लुल्हे यांनी पुस्तक भिशीची उद्दिष्टे व कार्यवाहीची संकल्पना स्पष्ट करून पुस्तकांचे त्यांच्या जीवन संघर्षातील अनन्यसाधारण योगदान सांगितले . प्रतिमा पूजनाला फाटा देऊन पुस्तकांचे पूजन करण्यात आले . ज्येष्ठ कार्यकर्ते दिगंबर कट्यारे यांनी वाचन चळवळ हा आचार-विचार संस्कृतीचा प्राणवायू आहे असे सांगितले. पहिल्या लकी ड्रॉची सोडत चिरंजीव वेद माळी या बालकाच्या हस्ते काढण्यात आली . आवडीचे पुस्तक खरेदी करण्याचा पहिला सन्मान सुदाम बडगुजर यांना प्राप्त झाला .उपस्थित सहयोगी सभासदांना पुस्तकांचे वितरण करण्यात आले . पुस्तक भिशीसाठी वर्षभर विविध प्रकाशनाची दर्जेदार वाचनीय पुस्तके उपलब्ध करून देण्याचे आश्वासन अथर्व पब्लिकेशन युवराज माळी यांनी जाहीर केले . कृती संशोधनात जिल्ह्यात द्वितीय क्रमांक प्राप्त छाया पाटील यांचा शाल, श्रीफळ, बुके देऊन शशिकांत हिंगोणेकर यांच्या हस्ते व सद्भावना राष्ट्रीय पुरस्कार प्राप्त चित्रकार सुनील दाभाडे यांचा सत्कार दिगंबर कटारे यांच्या हस्ते करण्यात आला.सदरहू उपक्रम स्थापनेचा सोळा सभासदांनी पाया भक्कम केला. अभिनव उपक्रमात कोणत्याही वयोगटाच्या निर्व्यसनी वाचक सभासदांना सहभागी व्हावयाचे असल्यास त्यांनी विजय लुल्हे यांच्याशी या भ्रमणध्वनीवर ( ९९२३३१५२११ ) संपर्क साधावा असे आवाहन करण्यात आले आहे. कार्यक्रमास अथर्व पब्लिकेशनचे संचालक युवराज माळी तसेच कुमुद पब्लिकेशनच्या संचालिका संगीता माळी तसेच सभासद डॉ.विजय बागुल, ह. भ. प. मनोहर खोंडे, उषा सोनार, रुचिका भावसार, कवी अशोक पारधे, कवी गोविंद पाटील, वर्षा अहिरराव मान्यवर उपस्थित होते. सुत्रसंचालन मनोज भालेराव व आभार प्रदर्शन रुचिका भावसार यांनी केले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी दगडू पाटील, दिपक महाले, दिपक साळुंके यांनी अमूल्य सहकार्य केले .







