जळगाव [प्रतिनिधी] – काल मुंबईत जळगाव राष्ट्रवादीचे महानगराध्यक्ष अभिषेक पाटील यांनी आपल्या कार्याचा अहवाल पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांच्याकडे सुपूर्द केला.


जळगाव महानगर जिल्हाध्यक्ष अभिषेक पाटील यांनी गत विधानसभा निवडणुकीत ऐन वेळेस तिकिट मिळूनही जळगावातून चांगली लढत दिली होती. यानंतर पक्षाचे महानगराध्यक्ष म्हणून त्यांनी वेळोवेळी विविध आंदोलन, निवेदने, निषेध मोर्चे आदींच्या माध्यमातून पक्षाच्या वृध्दीसाठी काम केले आहे. या सर्व बाबींचा आढावा घेणारा कार्याचा अहवाल पक्षाचे सर्वेसर्वा शरद पवार यांना सादर करण्यात आला आहे. तसेच प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील साहेब, संसदरत्न खा.सुप्रिया सुळे याना पण सादर केला. महानगर जिल्हाध्यक्ष म्हणून काम करत असतांना ते आणखीन प्रभावी कसं होतील याविषयी शरद पवार यांनी मार्गदर्शन केलं. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस जळगाव महानगरचे सचिव अँड.कुणाल पवार उपस्थित होते.







