जळगाव (प्रतिनिधी) – येथील मेहरूण परिसरातील रामेश्वर कॉलनी भागात अज्ञात चोरट्यांनी घरफोडी करून १५ हजार रुपये रोख लांबविल्याची घटना मंगळवार दि. १३ ऑक्टोबर रोजी सकाळी ११ ते दुपारी ३ वाजेच्या सुमारास घडली आहे.
याबाबत सुमन भीमराव आहिरे (वय-५० वर्षे) यांनी फिर्याद दिली आहे. त्या रामेश्वर कॉलनीत साई गजानन अपार्टमेंट येथे राहतात. भाजीपाला विक्री करून त्या उदरनिर्वाह करतात. मंगळवारी सकाळी त्या भाजीपाला विक्री करण्यास गेल्या होत्या. त्यांचा मुलगा राजेश डीमार्ट मॉलमध्ये कामास आहे. तो देखील डीमार्टला १०. ४५ वाजता कामावर गेला होता. दुपारी ३. १५ वाजता घरी पार्ट आल्यावर त्याला दरवाज्याचा काडी-कोंडा तुटलेल्या अवस्थेत दिसला. तसेच घरातील गोदरेज कपात देखील उघडे दिसले. त्याने त्याची आई फिर्यादी सुमन अहिरे यांना घटना कळविली. त्यानंतर एमआयडीसी पोलीस स्थानकात कळविण्यात आले. एकूण १५ हजार रुपये त्यांच्या कपाटातून अज्ञात चोरट्याने चोरून नेले आहे. त्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला असून तपास पोकॉ. गणेश शिरसाळे करीत आहे.