नवी दिल्ली (प्रतिनिधी) – उत्तर प्रदेश सरकारने हाथरसमधील सामूहिक बलात्कार आणि हत्या या प्रकरणाचा तपास सीबीआयकडे सोपविण्याचा निर्णय घेतला आहे. सीबीआय अधिकृतपणे या प्रकरणाचा तपास स्वीकारला आहे.
सीबीआयने या प्रकरणी भारतीय दंड संहितेतील सामूहिक बलात्कार आणि हत्येशी संबंधी कलमांखाली ‘एफआयआर’ नोंदवून स्वतंत्रपणे तपासाला सुरुवात केली असल्याची माहिती एका सीबीआय अधिकाऱ्यानी दिली.
या प्रकरणाचा तपाय ‘सीबीआय’च्या गाझियाबादच्या शाखेअंतर्गत होणार असल्याचेही सीबीआय अधिकाऱ्यानी सांगितले आहे.