नवी दिल्ली (वृत्तसंस्था) – भारतात पुढील वर्षाच्या सुरुवातीलाच करोनावर दोन लसी उपलब्ध होतील, अशी आशा केंद्रीय आरोग्य मंत्री डॉ. हर्ष वर्धन यांनी व्यक्त केली. डॉ. हर्ष वर्धन यांनी मंत्रिगटाच्या बैठकीत करोना लस व त्याच्या वितरणाविषयी महत्त्वाची माहिती दिली आहे.
हर्ष वर्धन म्हणाले कि, पुढच्या वर्षाच्या सुरुवातीला एकापेक्षा अधिक कंपन्यांनाकडून करोना विषाणूवर लस मिळेल, अशी आम्हाला आशा आहे. तज्ज्ञांचा गट देशात लसीचे वितरण कसे करावे, याविषयी योजना तयार करण्यासाठी धोरण ठरवत आहेत, अशीही माहितीही त्यांनी दिली आहे.
दरम्यान, रविवारी सोशल मीडियावर संडे संवाद कार्यक्रमादरम्यान त्यांनी जनतेशी संवाद साधला. यावेळी ते बोलत होते. यावेळी त्यांनी करोना व्हॅक्सीनचे अपडेटही दिले. वर्धन म्हणाले, वेगवेगळ्या व्हॅक्सीनचे परीक्षण सध्या फेज-1, फेज-2, फेज-3मध्ये सुरू आहे. याचे रिजल्ट अद्याप आले नाहीत. त्यामुळे करोना व्हॅक्सीनच्या इमरजंसी वापराचा विचार सरकारने अद्याप केला नाही.