मुंबई (वृत्तसंस्था) – सणासुदीच्या दिवसांमध्ये मोठ्या प्रमाणात ऑफर सुरु असतात. केंद्र सरकारने देखील नागरिकांसाठी नवीन योजना आणली आहे. सॉवरन गोल्ड बॉण्ड योजना २०२०-२१ लवकरच सुरु करणार आहे. यामध्ये नागरिकांना एक ग्रॅमच्या पटीत सोनं खरेदी करता येईल. ही गुंतवणूक ८ वर्षांसाठी असेल. पाच वर्षांनंतरयोजनेतून बाहेर पडता येईल. या योजनेच्या माध्यमातून किमान एक ग्रँम ते कमाल चार किलो सोन्यामध्ये तुम्ही गुंतवणूक करू शकता.
या योजनेमध्ये सरकारने एक ग्रॅम सोन्याची किंमत ५ हजार ५१ रुपये इतकी निश्चित केली आहे. रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाबरोबर सरकारने यासाठी चर्चा केली असून ऑनलाईन अर्ज करणाऱ्या आणि डिजिटल पद्धतीनं पैसे भरणाऱ्या गुंतवणूकदारांना प्रति ग्रॅम ५० रुपयांची सूट देण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळं ऑनलाईन पैसे देणाऱ्या ग्राहकांना यामध्ये मोठी सूट मिळणार आहे. या योजनेत सोन्यात गुंतवणूक करण्यासाठी तुम्ही व्यावसायिक बँका, नॅशनल स्टॉक एक्स्चेंज ऑफ इंडिया लिमिटेड, पोस्ट ऑफिस, स्टॉक होल्डिंग कॉर्पोरेशन ऑफ इंडिया लिमिटेड मध्ये अर्ज करू शकता. या योजनेत गुंतवणूक करून तुम्ही टॅक्स देखील वाचवू शकता. त्याचबरोबर यासाठी तुम्हाला पॅनकार्ड नंबर आणि माहिती देखील द्यावी लागणार आहे.
या योजनेत गुंतवणूक करणाऱ्या नागरिकांना थेट हातात सोने मिळत नाही. या सोन्याची गुंतवणूक इलेक्ट्रॉनिक स्वरुपात असते. त्यामुळे ती जास्त सुरक्षित असते. हे सोने शुद्ध स्वरूपाचे असते. या योजनेत तुम्ही सोन्यावर घेऊ शकता. पाच वर्षांनंतर प्रत्यक्षात सोनं मिळवता येतं.
सोन्याचा भाव ठरवण्यासाठी कोणतेही विशेष मार्ग नाहीत. आंतरराष्ट्रीय बाजारावर सोन्याची भाववाढ अवलंबून आहे. डॉलरच्या किमतीमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ झाल्याने सोन्याच्या किमती वाढत आहेत. १९१९ साली लंडनच्या पाच मोठ्या बुलियन ट्रेडर्सनी एकत्र येऊन सोन्याचे भाव निश्चित करण्याची पद्धत सुरू केली. लंडनमध्ये त्यावेळी ब्रिटिशांची सत्ता होती. जगभरात कोणतेही सरकार सोन्याचे भाव ठरवत नाही. सध्या आंतरराष्ट्रीय बाजारात सोने मोजण्याचे एकक औंस आहे. मात्र हे किती वजन आहे, हे अजूनपर्यंत स्पष्ट झालेलं नाही.