अहमदनगर (वृत्तसंथा) – राज्यात आता पुढील काळात लॉकडाऊनचा विषय राहिला नसून नोव्हेंबरपर्यंत महाराष्ट्रात संपूर्ण अनलॉक होईल, असे संकेत राज्याचे आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी दिलेत. नगरमध्ये पत्रकारांशी बोलताना त्यांनी आरटीपीसीआर टेस्टचा दर 800 रुपयांपर्यंत आणल्याची माहितीही दिली. राज्यात टप्प्याटप्प्याने शाळा, धार्मिक स्थळे, व्यायामशाळा उघडण्यात येतील आणि नोव्हेंबरपर्यंत संपूर्ण महाराष्ट्र अनलॉक होईल, अशी अपेक्षा करूया’, असं वक्तव्य टोपे यांनी केलं. त्याचबरोबर ’कोरोना व्हायरसवर अजून लस आलेली नाही, त्यामुळे आपल्याला काही नियम अटींसह शिस्त पाळली पाहिजे’, असंही आवाहन सुद्धा टोपे यांनी केलं.