जळगाव (प्रतिनिधी) – रेल्वे प्रशासन कडून यात्री सुविधासाठी लोकमान्य तिलक टर्मिनस कामख्या – लोकमान्य तिलक टर्मिनस दरम्यान विशेष गाड़ी चालवली जाणार आहे. हि रेल्वे पूर्णपणे आरक्षित गाड्या असतील.
गाड़ी क्रमांक – 02519 डाउन लोकमान्य तिलक टर्मिनस – कामख्या AC विशेष गाड़ी ही दि.18 ऑक्टोबर पासून पुढील आदेश पर्यंत दर रविवारला प्रस्थान स्टेशनहुन 7.50 वाजता रवाना होइल आणि तिसऱ्या दिवशी 04.25 वाजता कामख्या स्टेशनला पोहचेल. याचा थांबा – नासिक – 11.02/11.05 , मनमाड – 11.53/11.55, जलगाँव -13.32/13.34, भुसावल – 14.10/14.15 , खंडवा – 16.17/16.20 , इटारसी ,जबलपुर, कटनी, सतना, प्रयागराज चोकी, मिर्जापुर, पंडित दिन दयाल उपाध्याय, जंक्शन, दानापुर, पाटलीपुत्र, हाजीपूर, बेगुसराई, खगरिया, नौगाचिया, कठीहार, किशनगंज, न्यू जलपैगुडी, न्यू कूच बिहार, न्यू बोनगाईगाव, रंगिया असा राहील.
गाड़ी क्रमांक – 02520 अप कामख्या – लोकमान्य तिलक टर्मिनस AC विशेष गाड़ी ही दिनांक – 15 ऑक्टोबर पासून पुढील आदेश पर्यंत दर गुरुवारला प्रस्थान स्टेशन हुन 21.00 वाजता रवाना होइल आणि तिसऱ्या दिवशी 17.30 वाजता लोकमान्य तिलक टर्मिनस स्टेशन ला पोहचेल. थांबा – शनिवार – खंडवा – 08.32/08.35 , भुसावल – 10.25/10.30 ,जलगाँव -10.52/10.55, मनमाड – 12.36/12.38, नासिक – 13.25/13.30 असा असून याची सरंचना – 12 वातानुकूलित तृतीय श्रेणी, 4 वातानुकूलित द्वितीय श्रेणी, 1 वातानुकूलित प्रथम श्रेणी अशी राहील.