जळगाव (प्रतिनिधी) – येथील राष्ट्रवादी युवक कॉग्रेसची शहर आढावा बैठक प्रदेश सरचिटणीस प्रदीप कंद यांच्या उपस्थित घेण्यात आली.
राष्ट्रवादी युवक काँग्रेस जळगाव शहर आढावा बैठक आज दि.10 ऑक्टोबर रोजी राष्ट्रवादी भवन येथे संपन्न झाली. यावेळी प्रदेश सरचिटणीस तथा जळगाव जिल्हा प्रभारी प्रदीप कंद यांच्या उपस्थितीत झालेल्या बैठकीला जिल्हाशहर अध्यक्ष अभिषेक पाटील अध्यक्षस्थानी होते. युवक जिल्हाध्यक्ष स्वप्नील नेमाडे, प्रदेश सरचिटणीस ललित बागुल ,सचिव कुणाल पवार ,मजहर पठाण,रिजवान खाटीक,अनिल पाटील,वाय एस महाजन,जयश्री पाटील,ममता तडवी,कमलताई उपस्थित होते.
बैठकीत पक्ष संघटना मजबूत करणे, प्रभागनिहाय बुथ कमिटी, शाखा स्थापन करणे असे अनेक मुद्यांवर चर्चा झाली. प्रभारी प्रदीप कंद, अभिषेक पाटील, स्वप्नील नेमाडे, कुणाल पवार यांनी मनोगत व्यक्त केले. यावेळी अनेक युवकांनी राष्ट्रवादी पक्षात प्रवेश केला. तसेच युवक राष्ट्रवादी काँग्रेसची कार्यकारणी जाहीर करण्यात आली.
युवक अध्यक्ष स्वप्नील नेमाडे यांच्या कार्यकारिणीत उपाध्यक्ष म्हणून नितीन जाधव, उमेश पाटील,तेजस रडे,जयेश पाटील,तुषार सोनवणे,सलमान खाटीक,सौरभ पाटील,प्रविण हटकर,दिपक लहारे , तर सरचिटणीस हर्षवर्धन खैरनार, कल्पेश पाटील, पंकज बोरोले, त्रषीकेश पाटील, भुषण सोनवणे, जयेश पाटील, चिटणीस सागर सोनवणे, कितिंंकुमार पवार ,पंकज पाटील,यतीन अत्तरदे, संघटक जयेश नेवे, श्रीकांत चव्हाण, महेश नागरे, राजीव तडवी यांची नियुक्ती करण्यात आली.