नवी मुंबई (वृत्तसंथा) – राजे सर्व जनतेचे असतात, रयतेचे असतात, एका समाजाचे नाही. सर्व समाजाचा विचार राजांनी करावा. आता संभाजीराजे तलवारीचा वापर OBC वर करतात का अजून कोणावर करतात ते बघावं लागेल, अशा शब्दांत राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते, अन्न पुरवठा आणि ग्राहक संरक्षण मंत्री छगन भुजबळ यांनी खासदार संभाजीराजे छत्रपतींना लगावला आहे. आता शाब्दिक वाद थांबवावे, असं मत देखील भुजबळ यांनी यावेळी व्यक्त केलं.
छगन भुजबळ यांनी पत्रकारांशी संवाद साधला. ते म्हणाले, MPSC परीक्षा रद्द करू नये, हे माझं वैयक्तिक मत आहे.
कोरोनाच्या पार्श्वभूमीचा विचार करून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी निर्णय घेतला. आपल्याला राज्यात आता हळू हळू सर्व खुलं करायचं आहे. परिस्थिती बघून कमिटी निर्णय घेईल.
मात्र, केंद्र सरकारनं दक्षिण भारतातील कांद्याला निर्यात परवानगी दिली आणि महाराष्ट्राला नाही, हा दुजाभाव का? असा सवाल देखील भुजबळ यांनी यावेळी उपस्थित केला. मात्र, यामुळे भाव स्थिर राहायला मदत होईल.
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकारनं MPSC परीक्षा पुढे ढकरल्या आहेत. याबाबत मराठा संघटनांनी जोरदार मागणी केली होती. मात्र, परीक्षा पुढे ढकलण्याचा आणि मराठा संघटनेच्या मागणीचा काही एक संबंध नाही, असं अशोक चव्हाण यांनी सांगितलं आहे. छगन भुजबळ यांनी परीक्षा पुढे ढकण्याला तीव्र विरोध केला होता. आम्हाला नाही तर कुणालाच नाही ही भूमिका चुकीची असं भुजबळांनी म्हटलं होतं.
ते म्हणाले, यासंदर्भात मुख्यमंत्र्यांकडे बैठक झाली. आम्ही मराठा आरक्षणाच्या विरोधात नाही. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर भरती करणं आवश्यक आहे. जेवढ्या परीक्षा पुढे ढकलू तेवढं वय निघून जाईल. ज्यांना नोकऱ्या मिळू शकतात, त्यांना आपण का आडवत आहे. भरतीच्या आड कोणी यावं असं मला वाटत नाही.
राजे, नेत्यांनी मनाला लागेल, आशा गोष्टी टाळता आल्या तर त्या टाळल्या पाहिजे. शिवाजी महाराजांनी देखील अठरा पगड जातीला सोबत घेऊन लढाई लढली. महाराज हे सगळ्यांचे आहेत.
मराठा आरक्षणासह समाजाच्या विविध मागण्यांसाठी सरकारला जागं करण्यासाठी मराठा क्रांती ठोक मोर्चाच्या तिसऱ्या पर्वाला तुळजापूर येथून सुरूवात झाली. खासदार छत्रपती संभाजीराजे, खासदार ओमराजे निंबाळकर मोर्चात सहभागी झाले आहे.
यावेळी बोलताना संभाजीराजे यांनी राज्य सरकारवर गंभीर आरोप केले. मराठा आरक्षण टिकवण्यासाठी सरकारचे प्रयत्न कमी पडत असल्याचं दिसत आहे. केंद्र आणि राज्य सरकारमध्ये समन्वय नाही, असा घणाघाती आरोप संभाजीराजे यांनी यावेळी केला. आम्हला कायदा हातात घेण्याची वेळ आणू नका, वेळ आल्यास तलवार पण काढेन, असा सज्जड इशारा खासदार संभाजीराजे यांनी सरकारला दिला आहे. आम्ही भिकारी नाही तर हक्क मागत आहोत, अशा शब्दांत त्यांनी ठणकावलं.