बहाळ येथे युद्धपातळीवर शोधकार्य सुरू
चाळीसगाव (प्रतिनिधी) – घरची परिस्थती हलाखीची असल्याने ती मावशीकडे पनवेल येथे राहत होती़ नातेवाईकाकडे लग्न असल्याने ती गावाकडे आली़. मावस बहिणींसोबत नदीवर अंघोळीला गेली आणि दुदैवीरित्या पाण्याचा अंदाज न आल्याने गिरणा नदीच्या डोहात बुडाली़. यातील दोन बहिणांना बाहेर काढण्यात यश आले. यातील बुडालेल्या पुनमचा शोध सुरूच आहे. शनिवारी सकाळी ९:१५ वाजेची ही दुर्देवी घटना घडली आहे.
पूनम उखा खैरनार (वय १३) ही मूळ पाचोरा येथील रहिवासी आहे़. घरची परिस्थिती हलाखीची असल्याने ती पनवेल येथे मावशीकडे राहत होती. चाळीसगाव तालुक्यातील बहाळ येथे तिच्या नातेवाईकाकडे लग्न असल्याने ती आलेली होती़. यात पारोळा तालुक्यातील भोकरबारी येथील तिच्या मावस बहिणी खुशी चंद्रकांत सौदागार (वय-१३), मनिषा चंद्रकांत सौदागर (वय-११) या दोघीही आलेल्या होत्या़. बहाळ येथे घराजवळच हाकेच्या अंतरावर गिरणा नदी असल्याने त्या काल शुक्रवारीही या ठिकाणी अंघोळीला गेल्या होत़्या़. त्यानंतर आज शनिवारी सकाळी ९ वाजता पुन्हा या तिनही बहिणी याच नदीवर अंघोळीला गेल्या. पाण्यात पोहत असताना पाण्याचा अंदाज न आल्याने अचानक पुनम एका डोहात बुडाली़. गिरणेला पूर आल्यामुळे काही ठिकाणी नदी पात्रात खोल खड्डे पडले आहेत़, यात पुनम बुडाली आहे.
दोन बहिणीसाठी तो बनला देवदूत
तिनही बहिणी यावेळी नदीत पोहोत होत्या़ दोघींना काहीच कळाले नाही़, त्याही बुडत असल्याची परिस्थिती होती़. मात्र, यावेळी शौचासहून परतणाऱ्या गणेश अशोक भोई याने या दोन बहिणींना बुडत असतांना बघितले यावेळी गणेशने लगेच नदीत उडी घेऊन ख़ुशी व मनीषा या दोन्ही सख्या बहिणींना, तातडीने पाण्यातून बाहेर काढले़. दोघींना वाचविण्यात यश आले़. पुनम मात्र, पाण्यात हरवली होती. सकाळी दहा वाजेपासून तिचा शोध सुरू असून अद्यापही तिचा शोध लागलेला नव्हता. सर्व गाव नदीकाठावर गोळा झाले असून मेहूणबारे पोलीसही घटनास्थळी दाखल झाले आहेत. दुपारी एक पर्यंत पूनमचा शोध लागलेला नव्हता.
लग्न घरात दुसऱ्याच दिवशी शोक
ज्या घरात लग्न होते़, त्या घरात दुसऱ्याच दिवशीच शोक पसरल्याचे वातावरण होते़. पुनमचा शोध मात्र, लागलेला नव्हता़.सलग दोन दिवस या तिघी बहिणी नदीवर गेल्या होत्या मात्र, शनिवारी काळाने घाला घातला व एक बहिण डोहात बुडाली.