जळगाव (प्रतिनिधी) – जि.प.वाशीम येथील निवडणुकीच्या वादातून गोपाळ समाजातील धामणी ता.कारंजा जि.वाशीम येथे मोलमजुरी करणाऱ्या बांधवाचा निर्घुणपणे खून करण्यात आला.
पुरोगामी समजल्या जाणाऱ्या महाराष्ट्र राज्यात भटक्या विमुक्त जाती जमातींच्या लोकांना स्वातंत्र्याची 73 वर्ष उलटून देखील अन्याय अत्याचाराला सामोरे जावे लागत आहे.
आरोपींना कठोर शासन व्हावे याकरिता गोपाळ समाजहित महासंघ जळगाव जिल्हयातर्फे माननीय जिल्हाधिकारी यांना निवेदन देण्यात आले.
यावेळी जिल्हाध्यक्ष ग्यानदेव भोर
उपाध्यक्ष सुकदेव जाधव सल्लागार डॉ.प्रा.जगन्नाथ साळी, सुरेश नवघरे, सखाराम शिंदे, सचिव कैलास जाधव तसेच संघटनेचे विविध पदाधिकारी अर्जून जाधव मधुकर धनगर, गणेश काळे, गोरख नवघरे, काशिनाथ शिंदे(मा.सै.), ज्ञानेश्वर जाधव, दिपक गजाकुश, तुळशिराम साबळे (मा. सै.), गोपीनाथ भोंगाळ, प्रकाश कालापाड, विकास वंजारे, गजानन गोपाळ इ.उपस्थित होते.