नवी दिल्ली (वृत्तसंथा) – राजस्थानात एका पुजाऱ्याची हत्या झाल्याने संपुर्ण राज्य हादरले आहे. त्यानंतर विरोधकांनी गहलोत सरकारवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे. मृत पुजाऱ्याच्या कुटुंबियांनी 50 लाख रुपये आणि घरच्यातील एका सदस्याला सरकारी नोकरीची मागणी केली आहे. जोपर्यंत ही मागणी मान्य होत नाही तोपर्यंत, पार्थिवावर अंतिम संस्कार न करण्याचा निर्णय कुटुंबियांनी घेतला आहे. हत्या झालेल्या पुजाऱ्याचे नाव बाबूलाल वैष्णव असे असून, त्यांच्या हत्येशी संबंधित असलेले ग्रामसेवक आणि पोलीसांना अटक झाली पाहिजे. अशी मागणी कुटुंबियांनी गहलोत सरकारकडे केली आहे.
पुजारीच्या कुटुंबियांनी सांगितले की, ‘जोपर्यंत आमची मागणी पुर्ण होत नाही, तोपर्यंत आम्ही पार्थिवावर अंतिम संस्कार करणार नाही. सरकारने आम्हाला 50 लाख रुपये आणि सरकारी नोकरी द्यावी. सर्व आरोपींची तात्काळ अटक करण्यात यावी. या हत्येशी संबंधित असलेले ग्रामसेवक आणि पोलीसांवर कारवाई करावी.’ अशी मागणी कुटुंबियांनी केली आहे.’ त्यानंतर एका आरोपीला अटक करण्यात पोलीसांना यश प्राप्त झाले आहे.