जळगाव (विशेष प्रतिनिधी) – भारतीय छात्र संसदेच्या महाराष्ट्र राज्याच्या अध्यक्षपदी निवडून आल्याबद्दल उमाकांत राजेश जाधव याचे जळगाव जिल्हा अॅथलेटिक्स असोसिएशनतर्फे सत्कार करण्यात आला.
नवी दिल्ली येथील एम.आय.टी. स्कुल ऑफ गव्हर्नमेंट व भारत सरकारच्या युवा व क्रीडा मंत्रालयातर्फे २० ते २३ फेब्रुवारी या कालावधीत दहावी भारतीय छात्र संसद आयोजित करण्यात आली होती या भारतीय छात्र संसदेची विद्यार्थी निवडणूक नुकतीच पार पडली प्रत्येक राज्याच्या अध्यक्ष पदासाठी ऑनलाईन पद्धतीने ईमेल द्वारे मतदान घेण्यात आले या मतदान प्रक्रियेत देशभरातून ७४ हजार ३५२ विद्यार्थ्यांनी मतदान केले यात महाराष्ट्र राज्याच्या अध्यक्षपदी जळगावचे आंतरराष्ट्रीय डॉजबॉल खेळाडू,जळगाव जिल्हा अॅथलेटिक्स असोसिएशनचे सदस्य तथा जी.एच. रायसोनी इन्स्टिट्यूट ऑफ बिझनेस मॅनेजमेंटचे एम.बी.ए. चे विद्यार्थी उमाकांत राजेश जाधव विजयी झाले त्यांच्या या विजयाबद्दल जळगाव जिल्हा अॅथलेटिक्स असोसिएशनच्या वतीने जिल्हा अॅथलेटिक्स असोसिएशनचे कार्याध्यक्ष प्रा.डॉ.पी.आर चौधरी व उपाध्यक्ष प्रा.डॉ.विजय पाटील यांनी यथोचित सत्कार केला याप्रसंगी जळगाव जिल्हा अॅथलेटिक्स असोसिएशनचे सचिव राजेश जाधव सहसचिव किशोर पाटील, खजिनदार निलेश पाटील कार्यकारिणी सदस्य सचिन महाजन, नितीन पाटील व जळगाव जिल्हा अॅथलेटिक्स असोसिएशनचे प्रसिद्धी प्रमुख मनोज वाघ यांची उपस्थिती होती. तसेच दि २३ ऑक्टोबर रोजी पुणे येथील एम.आय.टी. वर्ल्ड पीस युनिव्हर्सिटी येथे आयोजित करण्यात आलेल्या शपथविधीस त्यांनी शुभेच्छा दिल्या. उमाकांत जाधव हे साई मोरया ग्रुपचे अध्यक्ष असून युवाशक्ती फाऊंडेशनचे पदाधिकारी आहेत याप्रसंगी त्यांच्या भावी वाटचालीस शुभेच्छा देण्यात आल्या.