आमदार सोनवणे यांच्या मागणीला
पाणीपुरवठा मंत्री ना. गुलाबराव पाटील यांचा हिरवा कंदील
वडती ता. चोपडा (प्रतिनिधी) – राज्याचे पाणी पुरवठा व स्वच्छता मंत्री व जळगाव जिल्ह्याचे पालकमंत्री मा. ना.गुलाबराव पाटील यांच्या अध्यक्षतेखाली मंत्रालय, मुंबई येथे आज दि. ८ ऑक्टोबर 2020 रोजी सकाळी ११.०० वा. जळगाव जिल्ह्यातील अपूर्ण व प्रस्तावित नवीन पाणी पुरवठा योजनांची आढावा बैठक पार पडली. या बैठकीत आमदार सौ. लताताई सोनवणे व माजी आमदार प्रा. चंद्रकांत सोनवणे यांनी चोपडा मतदारसंघातील चोपडा व यावल तालुक्यातील विविध 34 योजना जलजीवन मिशन अंर्तगत प्रस्तावित करणे व लासुर व ८ गावे, धानोरा, अडावद येथील रखडलेल्या योजनांबाबत प्रश्न उपस्थित केला असता मंत्री महोदयांनी संबंधित अधिकाऱ्यांना तीनही गावांचे पाणी पुरवठा योजनांचे अंदाजपत्रक मंजुरी साठी त्वरित मुख्य अभियंता जीवन प्राधिकरण यांच्यामार्फत शासनाकडे सादर करण्याचे आदेश दिले यामुळे अनेक वर्षांपासून रखडलेल्या या तीनही गावांच्या पाणी पुरवठा योजनांना चालना मिळणार आहे.
यावेळी पाचोरा येथील आमदार किशोर पाटील ‘जल जीवन मिशन’च्या अभियान संचालक श्रीमती आर. विमला, पाणी पुरवठा व स्वच्छता विभागाचे विशेष कार्य अधिकारी चंद्रकांत गजभिये, जीवन प्राधिकरणचे सदस्य सचिव किशोर राजे निंबाळकर कक्ष अधिकारी श्रीमती सरोज देशपांडे, अधीक्षक अभियंता प्रशांत भामरे, श्री. नन्नवरे, कार्यकारी अभियंता श्री. निकम आदी यावेळी उपस्थित होते.







