

जळगाव (प्रतिनिधी) – जळगाव लोकसभेचे शिवसेनेचे संपर्क प्रमुख संजय सावंत यांच्या हस्ते डॉ.सिद्धांत मिलिंद डहाळे.(MD.Med).,यांनी नुकत्याच झालेल्या NEET Exam मधे (DM प्रवेशासाठी )., भारतातून ४० व्या क्रमांक व उत्तर महाराष्ट्रातून पहिला क्रमांक मिळवून उत्तीर्ण झाले.त्यांच्या या घवघवीत यशा बद्दल सत्कार करतांना जळगाव लोकसभेचे शिवसेनेचे संपर्क प्रमुख व सिद्धिविनायक मंदिर न्यासाचे संचालक संजय सावंत, शिवसेना जिल्हाप्रमुख गुलाबरावजी वाघ, लोकनियुक्त नगराध्यक्ष निलेश चौधरी.,उपजिल्हाप्रमुख पि.एम.पाटील, सामाजिक कार्यकर्ते व कट्टर शिवसैनिक अक्षय मुथा यांना कोरोना योद्धा म्हणून गौरविण्यात आले व विनोद रोकडे यांचा धरणगांव परीट धोबी समाजाचे युवक अध्यक्ष म्हणून निवडी बद्दल सत्कार करण्यात आला, यावेळी शिवसेना नगरसेवक व पदाधिकारी व शिवसैनिक उपस्थित होते.यावेळी संजय सावंत यांनी डॉ.सिध्दांत डहाळे यांना पुढील डीएमचा वैद्यकीय अभ्यासात शुभेच्छा दिल्या व हिदुंजा हाॅस्पिटलला काही अडचण आल्यास मी आपल्याला मदत, सहकार्य करण्यास कठीबद्ध आहे असे वचन सांवत यांनी दिले .
तसेच त्यांच्या हस्ते उमेश सुरेश चौधरी, रामकृष्ण महाजन, सागर ठाकरे यांच्या वाढदिवसा निमित्त सत्कार करण्यात आला.







