गुढे.( प्रतिनिधी) – देशात कोरोना महामारी रोखण्यासाठी अनेक उपाययोजना म्हणून २२मार्चपासून शासनाने लाँकडाऊन लावण्यात आले.या धाडसी निर्णयाच्या काळात ग्रामीण भागात देखील मोठी भीती व अनेकांनी धसका घेतला होता.अशा कठीण काळात अनेक ठिकाणी डॉक्टर लोकांनी देखील दवाखान्याला कुलूप लावून बाहेरगांवी गेले असल्याचा सुचना,पत्रक दवाखान्यात लावून गायब झाली.पण गुढे या दहा हजार लोकसंख्येच्या मोठ्या विस्ताराच्या गांवात येथील सुपुत्र डॉ.शांताराम नथू पाटील यांनी मात्र कोरोना महामारीच्या वाईट काळात,कठीण परिस्थितीत मात्र त्यांनी गावांकडे पाठ न फिरवता रात्रंदिवस गांव व परिसरासाठी स्वतःचा व परिवाराचा जीव धोक्यात घालून२४तास अहोरात्र आरोग्यसेवा करून गांवातील अनेकांना मानसिक धीर देत आहेत व मनातील भीती घालवत आहेत ती खऱ्याअर्थाने गावाला मोठी सकारात्मक ऊर्जा मिळत आहे.म्हणून ते खऱ्याअर्थाने गावाचे मसिहा कोरोना योध्दा आहेत.

डॉ.शांताराम पाटील हे गेल्या ३५वर्षांपासून गांव परिसरासाठी उत्तम व तत्पर आरोग्यसेवा देत असल्याने त्यांचे वैद्यकीय क्षेत्रात देखील मोठे नाव झाले आहे म्हणून त्यांनी मोठा गोतावळा निर्माण केला आहे.म्हणून त्यांना सन्मानजनक स्थान निर्माण केले आहे.गांव परिसरात अखंडपणे आरोग्य सेवा करत आहे. म्हणून या आरोग्यदूतांची गावात मोठी नाड जुळली असून व सर्व समाजात त्यांचे मोठे सलोख्याचे,प्रेमाचे,स्नेहाचे संबंध निर्माण झाले आहेत म्हणून त्यांना अर्धे गांव मामा व अर्धे गांव शांताराम नाना ही लोकपदवी दिली आहे.डॉ. शांताराम पाटील यांनी ३५वर्षात पैशाला कधीच महत्त्व दिले नाही कोणीही गोरगरीब रात्रीबेरात्री दवाखान्यात येवो त्यांनी कधी कोणालाही परत केले नाही जे दिले ते घेत आजही गावात एक चांगली सेवा देत आहे या कठीण काळात त्यांच्या बरोबर गांवातील डॉ. नितेश बोरसे यांची देखील त्यांना साथ मिळाली त्यांनी देखील कोरोना काळात चांगली सेवा देत असल्याचे डॉ. पाटील यांनी सांगितले







