भीम आर्मी संघटनेसह सोळा संघटना सहभागी

पारोळा (प्रतिनिधी) – बुलगढ़ी जिल्हा हाथरस (उत्तर प्रदेश) येथील निर्दयी हत्या व बलात्कार या घटनेच्या विरोधात व उत्तर प्रदेश सरकार कडून आरोपींना पाठीशी घालण्यासाठी सत्तेच्या दुरुपयोच्या निषेध म्हणून व कु. मनीषा वाल्मिकी ईला न्याय मिळण्यासाठी पारोळा शहरात भीम आर्मी संघटने सह इतर समाज आणि सामाजिक संघटने मार्फत आज भव्य रॅली काढण्यात आली.विश्वरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून आणि कु. मनीषा वाल्मिकी यांना श्रद्धांजली वाहून रॅली ला सुरवात झाली.बाजार पेठ मार्गे जात छत्रपती शिवाजी महाराजांना पुष्पहार अर्पण करून पारोळा पोलीस स्टेशन येथे तहसीलदार यांना निवेदन देण्यात आले.
यावेळी रॅली मध्ये बेटी हम शर्मीदा है, तेरे कातिल जिंदा है, आरोपींना फाशी द्या , योगी सरकार मुरदाबाद च्या घोषणा देण्यात आल्या. घटनेतील आरोपींना तत्काळ फाशी देण्यात यावी आणि पीडित मुलीला न्याय मिळण्याची मागणी निवेदनात करण्यात आली.
यावेळी भीम आर्मी संघटने चे तालुका प्रमुख जितेंद्र वानखेडे यांच्यासह भगवान सोनवणे, योगेश महाले , सचिन नेतकर, कमलेश सोनवणे, मनोहर केदार, भाऊसाहेब सोनवणे ,सचिन खेडकर, सागर, यांच्यासह इतर सामाजिक संघटनेचे पदाधिकारी- विजय पाटील, संदीप पाटील, प्रताप पाटील, दिनेश पाटील, गणेश भाऊ सपकाळे ,किशोर पाटील , सागर भाऊ भोसले, राजेंद्र चौधरी, कपिल चौधरी, गणेश पाटील ईश्वर पाटील, तेजु नळवाले, विशाल नळवाले, ईश्वर बाबा, राकेश करोसिया, दीपक अनुष्ठान, विनोद अवचित , विकास अंभोरे, राजू कांबळे, शाम भाऊ वंजारी, अरविंद वंजारी, रवींद्र भोई, अनिल सोनवणे, मनोज सोनवणे, निलेश कापडणे, गौतम जावळे, जुबेर भाई, फईम खान पठाण,अबीद पठाण उपस्थित होते.
यावेळी भीम आर्मी संघटना, वाल्मिकी मेहतर समाज, छावा संघटना, शिव छावा संघटना, शेतकरी संघटना, बंजारा शेतकरी सेना, मुस्लिम समाज मंडळ, मराठा सेवा संघ, राष्ट्रवादी युवक काँग्रेस, वंचित आघाडी, पंचशील मित्र मंडळ, भोई समाज मंडळ, संभाजी सेना, गाडी लोहार समाज यांनी निवेदन देत सहभाग घेतला .







