जळगाव (प्रतिनिधी) – अखिल भारतीय गुर्जर देवसेना व हेल्थ प्लस इन्स्टिट्यूट यांच्या संयुक्त विद्यमानाने ३ व ४ ऑक्टोबर रोजी वैद्यकीय क्षेत्रातील रोजगार मेळावा कार्यक्रमाला विद्यार्थ्यांनी भरभरून प्रतिसाद दिला.


या मेळाव्याला पाचोरा भडगाव चाळीसगाव जळगाव तसे चोपडा या ठिकाणी विद्यार्थ्यांनी विचारणा केलेली होती व ३८ अर्ज प्राप्त झाले. काही जणांना कोरोनाच्या परिस्थितीमुळे स्वतः येणे शक्य नसल्यामुळे ऑनलाइन अर्ज केलेले आहेत. ९ विद्यार्थ्यांचे या ठिकाणी नेमणूक ही विविध हॉस्पिटलला हेल्थ प्लसच्या वतीने करण्यात आलेली आहे .
या कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष डि के पाटील, महाराष्ट्र प्रदेश कार्यकारी अध्यक्ष सुनील ज्ञानेश्वर पाटील, महाराष्ट्र प्रदेश प्रवक्ता अँड. सुनील पाटील, महाराष्ट्र प्रदेश सहसचिव गजानन पाटील हेल्थ पलस इन्स्टिट्यूटच्या संचालिका भारती काळे व डायरेक्टर राकेश कंडारे सर तसेच सर्व अखिल भारतीय गुजर देवसेनेच्या पदाधिकाऱयांनी मेहनत घेतली.








