देवकर मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल
जळगाव (प्रतिनिधी) – येथील श्री. गुलाबराव देवकर मल्टीस्पेशालिटी वैद्यकीय व आयुष रुग्णालय सोमवार दि. 5 ऑक्टोबर पासून जनसेवेत दाखल होत आहे. जिल्ह्याच्या विकासात हे हॉस्पिटल विकासाची गंगा ठरणार असुन हॉस्पीटल सुसज्ज झालेले आहे.
जिल्ह्याचे माजी पालकमंत्री गुलाबराव देवकर यांनी विकासकामांचे स्वप्न पाहत असताना जिल्हावासीयांना उत्कृष्ट व सर्व सुविधायुक्त हॉस्पिटल असले पाहिजे असे वाटत होते. शैक्षणिक विकासात देवकरांनी श्रीकृष्ण शैक्षणिक व सांस्कृतिक मंडळ, जळगावच्या अंतर्गत गुलाबराव देवकर अभियांत्रिकी महाविद्यालय आणि पॉलिटेक्निक महाविद्यालय स्थापन करून महत्वाचे योगदान दिलेले आहे. यामुळे अनेक विद्यार्थ्यांना शैक्षणिक सुविधा मिळून चांगले अभियंता निर्माण झाले आहेत.
आता देवकर मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटलद्वारा आरोग्य क्षेत्राच्या विकासात गुलाबराव देवकरांचे स्वप्न पूर्ण होत आहे. जिल्ह्यात अत्याधुनिक सुविधा आणि शासकीय दरानुसार उपचार मिळणारे 70 खाटांचे कोविड केअर सेंटर रुग्णांसाठी सज्ज झाले आहे. तसेच वैद्यकीय व आयुष रुग्णालयात सुसज्ज वातानुकूलित 18 बेडचा आयसीयू विभाग देखील आहे. 40 बेड ऑक्सिजन व्यवस्था असलेले जनरल वार्ड, व्हेन्टिलेटरची सुविधा, प्रशिक्षित व अनुभवी कर्मचारी वर्ग याठिकाणी नेमण्यात आले आहे. 5 वातानुकूलित स्पेशल रुम उभारण्यात आल्या असून बायपॅप व एनआयव्हीची सुविधा उपलब्ध करून देण्यात येत आहे. सेंट्रल मॉनिटरिंग सिस्टीम आणि मल्टी पॅरा मॉनिटरिंग सुविधांसह सुसज्ज, स्वच्छ, निसर्गरम्य वातावरणात रुग्णालय उभारण्यात आले आहे.
हॉस्पिटलमध्ये विविध क्षेत्रातील तज्ज्ञ डॉ.पंकज महाजन, डॉ. चेतन चौधरी, डॉ. प्रियांका पाटील यांच्या नेतृत्वाखाली वैद्यकीय स्टाफ रुग्णसेवा देण्यासाठी सज्ज झालेला आहे. रुग्णांना बरे होण्यासाठी रोज ध्यान व योगा, पौष्टिक नाश्ता व जेवणाची सोय तसेच 24 तास थंड, मिनरल पाण्याची सुविधा येथे उभारण्यात आली आहे. रुग्णांना सोयीचे आणि सुसज्य, स्वच्छ व निसर्गरम्य वातावरणात उपचार पद्धती राबविली जाणार आहे.अधिक माहितीसाठी डॉ. नितीन पाटील 7507724200 यांच्याशी संपर्क साधावा. नागरिकांनी देवकर मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटलला येऊन वैद्यकीय सेवेचा लाभ घ्यावा, असे आवाहन श्री. गुलाबराव देवकर मल्टीस्पेशालिटी वैद्यकीय व आयुष रुग्णालयाचे संचालक विशाल देवकर यांनी केले आहे.