जळगाव (प्रतिनिधी) – धनाजी नाना चौधरी विद्या प्रबोधिनी संचालित शिरीष मधुकरराव चौधरी महाविद्यालय जळगाव येथील सायन्स फोरम व ग्रीन क्लब यांच्या मार्फत महात्मा गांधी जयंती निमित्त एक दिवसीय स्टुडन्ट सोलर अँबेसेडर ऑनलाईन कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले. आयोजन आय आय टी बॉम्बे आणि महाविद्यालयाच्या संयुक्त विद्यमाने करण्यात आले. महाविद्यालयातील ५१ विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदविला.
सहभागी विद्यार्थ्यांना, प्रा. डॉ. चेतन सिंग सोळंकी , प्रा. डॉ. अनिल काकोडकर, श्रीमती गांधी, प्रा. डॉ. सुभासिस चौधरी, प्रा. डॉ. के विजयराघवन या आय आय टी बॉम्बे मधिल तज्ज्ञ व्यक्तींनी वेबिनार द्वारे विद्यार्थ्यांना मोलाचे मार्गदर्शन केले. पर्यावरण संवर्धन विषयी मुलभूत अशी माहिती दिली. कार्यशाळेत विद्यार्थ्यांना सौर ऊर्जेचे महत्व पटवून दिले.
सदर विद्यार्थ्यांना आय आय टी बॉम्बे कडून ५१ सोलर दिवे व प्रमाणपत्र देण्यात येणार आहेत. या ऑनलाईन कार्यशाळेला महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. आर. बी. वाघुळदे, प्रा. डॉ. मिलिंद काळे, प्रा. अनिल सोनवणे, प्रा. डॉ. रवींद्र लढे, प्रा. डॉ. राजकुमार लोखंडे, प्रा. वनिता नेमाडे यांचे सहकार्य लाभले.








