जळगाव (प्रतिनिधी) – केंद्र सरकारने शेतकरी विरोधी तीन विधेयके संसदेत मंजूर करून नवीन आणलेल्या काळया कायद्यामुळे शेती आणि शेतकरी पूर्णपणे उद्ध्वस्त होणार असल्याचा आरोप करत या कायद्यांच्या विरोधात जिल्हा कॉंग्रेस पक्षातर्फे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निदर्शन करण्यात आले.
भारतीय राष्ट्रीय काँग्रेसतर्फे दि. २६ सप्टेंबरपासून भाजप सरकारच्या शेतकरीविरोधी विधेयकांना विरोध दर्शविण्यासाठी ऑनलाईन मोहीम सुरू करण्यात आलेली आहे. सोशल मीडिया मार्फत भाजप सरकारचा निषेध करण्याचे व सदर काळा कायदा मागे घेण्याची मागणी करण्याची मोहीम सुरू झालेली आहे. दि. २ ते ३१ ऑक्टोबर दरम्यान विविध आंदोलने छेडली जाणार आहेत. त्यात शुक्रवारी दि. २ ऑक्टोबर रोजी महात्मा गांधी व माजी पंतप्रधान लालबहादूर शास्त्री यांच्या जयंतीनिमित्ताने ‘मजदूर बचाव दिवस’ पाळला जात आहे. दरम्यान शुक्रवारी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निदर्शने करीत काँग्रेसतर्फे जिल्हाधिकारी अभिजित राऊत यांना निवेदन देण्यात आले.
याप्रसंगी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे सरचिटणीस प्रकाश मुगदिया, जिल्हाध्यक्ष अँड. संदीप भैय्या पाटील, आ. शिरिष चौधरी, जिल्हा परिषद गट नेते प्रभाकर सोनवणे, एनएसयुआय जिल्हाध्यक्ष देवेंद्र मराठे, माजी जिल्हाध्यक्ष उदय पाटील, श्याम तायडे, अल्पसंख्य शहराध्यक्ष अमजद पठाण, जाकीर बागवान, ज्ञानेश्वर कोळी, उद्धव वाणी, दीपक सोनवणे, जगदीश काळे ,प्रदीप सोनवणे प्रतिभा मोरे, योगिता शुक्ल, अरुणा पाटील, छाया कोरडे, सुलोचना वाघ, जलील पटेल, रहीम कुरेशी, इम्रान खान, बाबा देशमुख, योगेश देशमुख, जमील शेख, अजाबराव पाटील आदी पदाधिकारी व जिल्ह्यातील सर्व काँग्रेस पदाधिकारी, फ्रंटलचे पदाधिकारी, लोकप्रतिनिधी, कार्यकर्ते उपस्थित होते.
काँग्रेसच्या चालणाऱ्या मोहिमेअंतर्गत १० ऑक्टोबर रोजी राज्यस्तरीय किसान संमेलन संपन्न होणार आहे. या किसान संमेलनातून भाजपाने केलेल्या अन्यायग्रस्त कायद्यांच्या विरोधात आवाज उठवला जाणार आहे. तसेच स्वाक्षरी मोहीम राबवली जाणार आहे. शेतकरी, शेतमजूर, बाजार समितीतील दुकानदार, बाजार समितीमधील कामगार, कष्टकरी यांच्या सह्यांची मोहीम राबवून दोन कोटी सह्यांचे निवेदन तयार करून भाजपा सरकारचा निषेध व्यक्त केला जाणार असून शेतकरी, शेतमजूर, कष्टकऱ्यांच्या विरोधात जो काळा कायदा निर्माण केला आहे तो मागे घ्यावा यासाठी सर्वसामान्य शेतकऱ्यांना सोबत घेऊन आवाज उठविला जाणार आहे, अशी माहिती जिल्हाध्यक्ष अँड. संदीप भैय्या पाटील यांनी दिली.







