फैजपूर प्रतिनिधी सलीम पिंजारी तालुका यावल जिल्हा जळगाव
फैजपूर (प्रतिनिधी) – इंडियन जर्नलीस्ट असोसिएशनची आज दि. २९ रोजी जळगाव जिल्हा कार्यकारिणी जिल्हाध्यक्ष फारुख शेख यांच्या प्रमुख उपस्थितीत जाहीर करण्यात आली. संघटनेचे जळगाव जिल्हाध्यक्ष फारुख शेख तसेच सर्व तालुक्यांतील पत्रकार बांधवांच्या उपस्थितीत व सर्वसंमतीने जिल्हा कार्यालयात आज या नियुक्त्या जाहीर करण्यात आल्या.
वरीष्ठ जिल्हा उपाध्यक्षपदी संदिप धर्मराज पाटील चाळीसगाव, उपाध्यक्ष परशुराम बोंडे भुसावळ, विलास पाटील चोपडा, निलेश राजपूत रावेर, जिल्हा संघटक शकील शेख रावेर, जिल्हा कार्याध्यक्ष श्याम वसंत पाटील सावदा, सरचिटणीस कृष्णा बाजीराव पाटील, कोषाध्यक्ष हेमंत पाटील जळगाव, वरिष्ठ सल्लागार बाळासाहेब मोरेश्वर राणे जळगाव,कार्यालय सचिव मुबारक चांदखॉ तडवी, सदस्य नासीर शेख चाळीसगाव, आरीफ आझाद मुक्ताईनगर,राजू नवाब तडवी, दिलीप गिरधर सोनवणे पाचोरा,हबीब चव्हाण भुसावळ इ.जिल्हा पदाधिकार्यांच्या नियुक्त्या जाहीर करण्यात आल्या.
कार्यक्रमाच्या सुरुवातीला धरणगाव येथील पत्रकार शरदकुमार बन्सी यांचे कोरानाने निधन झाल्याने त्यांना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली.इंडीयन जर्नलीस्ट असोसिएशन पत्रकारांच्या विविध समस्या सोडविण्यासाठी प्रयत्न करणार असुन नेहमी पत्रकारांच्या न्याय्य हक्कांसाठी त्यांच्या पाठीशी भक्कमपणे उभी राहणार आहे असे प्रतिपादन कार्यक्रमाचे अध्यक्ष तसेच असोसिएशनचे जिल्हाध्यक्ष फारुख शेख यांनी व्यक्त केले.प्रास्ताविक श्याम पाटील यांनी, सुत्रसंचलन संदिप पाटील यांनी तर आभारप्रदर्शन शकील शेख यांनी केले.







