वॉशिंग्टन (वृत्तसंस्था ) – अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल़्ड ट्रम्प आणि पत्नी मेलानिया कोरोना पॉझिटिव्ह आले आहेत. स्वतः ट्रम्प यांनी ट्विट करत याबद्दल माहिती दिली आहे. त्याआधी डोनाल्ड ट्रम्प यांची खासगी सल्लागार होप हिक्स यांना कोरोनाची लागण झाली असल्याचे समोर आले आहे. त्यानंतर डोनाल्ड ट्रम्प यांनी स्वत: ला क्वारंटाइन केले होते.
ट्रम्प म्हणाले कि, ‘होप हिक्स, कोणतीही सुटी न घेता अथक काम करत होते. ते कोरोना पॉझिटिव्ह आले आहेत. धक्कादायक असून माझी पत्नी मेलानिया आणि मी आमच्या चाचणीच्या रिपोर्टची वाट पाहत होतो. यादरम्यान आम्ही क्वारंटाईन प्रक्रिया सुरु केली आहे, दरम्यान, आता कोरोनाचा पॉझिटिव्ह अहवाल आल्यानंतर त्यांनी याची माहिती देत उपचार सुरु केल्याचे म्हंटले आहे.