“जीवन मे खेलकुद का महत्व” या विषयावर ऑनलाईन वेबिनार संपन्न
रावेर (प्रतिनिधी) – ऐनपूर येथील सरदार वल्लभभाई पटेल कला आणि विज्ञान महाविद्यालय, ऐनपूर तर्फे “जीवन मे खेलकुद का महत्व” या विषयावर ऑनलाईन वेबिनार संपन्न झाला. यात डॉ. आनंद उपाध्ये, (पु. ओ. नाहाटा महाविद्यालय भुसावळ येथील शारीरिक शिक्षण विभागाचे प्रमुख) यांनी सहभागी प्राध्यापक, विद्यार्थी, खेळाडू यांना खेळ जीवनात किती महत्वाचा आहे. तसेच व्यायाम, सकस आहार, योगा आपल्या दैनंदिन जीवनात किती महत्वाचे आहे हे सांगितले. तसेच कार्यक्रमाचे अध्यक्ष महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. जे. बी. अंजने यांनी जीवनात खेळ हे अमृत आहे तसेच विविध प्रकारचे खेळामुळे आपले जीवन कसे सुखमयी बनते व जीवनात कोणताच आजार येत नाही हे सांगितले. तसेच वेबिनारचे आयोजक डॉ. सचिन झोपे (महाविद्यालयाचे शारीरिक शिंक्षण संचालक) यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नुकताच केलेल्या खेळ संवादवर –‘फिटनेस का डोस आधा घंटा रोज’ टिप्पणी केली व विद्यार्थ्यांना व सहभागी प्राध्यापकांना याविषयी मार्गदर्शन केले. तसेच नुसतेच खेळून चालणार नाही तर त्याबरोबर आपला आहार हि संतुलित ठेवावा असेही सांगितले. सदर वेबिनारचे सदस्य डॉ. के. जी. कोल्हे, सिनेट सदस्य (क. ब. चौ. उ. म. विदयापीठ, जळगाव), प्रा. एन. यु. बारी, व्यवस्थापन परिषद सदस्य (क. ब. चौ. उ. म. विदयापीठ, जळगाव), डॉ. आर. व्ही. भोळे, डॉ. संदीप साळुंके, डॉ. जयंत नेहेते यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले. त्याचप्रमाणे कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ. संदीप साळुंके यांनी केले. आभार डॉ. जयंत नेहेते यांनी मानले.







