जळगाव(प्रतिनिधी) – काँग्रेस पक्षाचे नेते खासदार राहुल गांधी व अखिल भारतीय काँग्रेस कमिटीच्या सरचिटणीस प्रियंका गांधी हाथरस येथील घटनेप्रकरणी पीडित तरुणीच्या घरी सांत्वनासाठी जात असताना उत्तर प्रदेश पोलिसांकडून त्यांना रस्त्यामध्ये अडविण्यात आले. त्यानंतर राहुल गांधी व प्रियंका गांधी हे रस्त्याने पायी चालत हाथरस येथे पोहोचण्याचा प्रयत्न करत असताना उत्तर प्रदेशच्या पोलिसांनी राहुल गांधी यांना धक्काबुक्की करत जमिनीवरही पाडले. जळगाव जिल्हा काँग्रेस पक्षाच्या वतीने मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांचा पुतळा दहन करून या संपूर्ण कृत्याचा निषेध व्यक्त केला.
या प्रसंगी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे सरचिटणीस प्रकाश मुगदिया, एन एस यु आय जिल्हाध्यक्ष देवेंद्र मराठे, शहर उपाध्यक्ष श्याम तायडे, युवक काँग्रेस प्रदेश सरचिटणीस बाबा देशमुख, अल्पसंख्यांक शहराध्यक्ष अमजद पठाण, युवक काँग्रेस शहराध्यक्ष मुजीब पटेल, अविनाश भालेराव, विजय वाणी, जमील शेख,नदीम काझी, राजेश कोतवाल, दीपक सोनवणे, जाकीर बागवान, मनोज सोनवणे, मनोज चौधरी,विष्णू घोडेस्वार, अलका सोनवणे, उद्धव वाणी, छाया कोरडे, अनिल देसरडा, जगदीश गाडे, किशोर सूर्यवंशी आदी पदाधिकारी उपस्थित होते.







