नवी दिल्ली (वृत्तसंस्था) – उत्तर प्रदेशमध्ये हाथरस येथे एका तरुणींनी सामूहिक बलात्कार करत तिची हत्या केली आहे. या घटनेचा देशभरातून निषेध करण्यात आली आहे. या पार्श्वभूमीवर काँग्रेसच्या सरचिटणीस प्रियंका गांधी आणि राहुल गांधी पीडित कुटुंबाच्या भेटीसाठी हाथरसला रवाना झाले आहेत. परंतु, जिल्ह्यात कलम १४४ लागू करण्यात आल्याने त्यांचा ताफा यमुना महामार्गावर अडवण्यात आला. तेथून पुढील प्रवास त्यांनी पायी चालत जाण्याचा निर्णय घेतला आहे.
राहुल गांधी आणि प्रियांका गांधी आज हाथरस पीडितेच्या कुटुंबाची भेट घेऊन त्यांची विचारपूस करणार आहेत. परंतु, त्याआधीच जिल्ह्यात कलम १४४ लागू करण्यात आले होते. यामुळे पाच पेक्षा अधिक लोकांना एकत्र येण्यास बंदी घालण्यात आली होती. हे आदेश ३१ ऑक्टोबरपर्यंत लागू आहेत.
जळगाव शहरात हाथरस घटनेचे पडसाद
घोषणाबाजी, उपोषण, थाळीनादने दिवस गाजला
जळगाव (प्रतिनिधी) – उत्तर प्रदेशमधील हाथरस येथील मुलीवर अत्याचार करून हत्या झाल्याच्या घटनेबद्दल उत्तर प्रदेश सरकारचा निषेध गुरुवारी 1 ऑक्टोबर रोजी दिवसभरात विविध संस्था व संघटनांनी केला. तसेच, दोषींवर कठोर कारवाई करून फाशी द्यावी अशी मागणी करण्यात आली. जिल्हाधिकारी कार्यालयाबाहेर थाळीनाद, घोषणाबाजी, एकदिवसीय उपोषण देखील करण्यात आले.
हाथरस येथील निर्भयावर अत्याचार करणार्यांना फाशीची शिक्षा देण्यात यावी या मागणीसाठी सय्यद नियाज अली भैय्या फाउंडेशनच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयासमोर थाळीनाद आंदोलन करण्यात आले.
दिल्ली, कठुआ, हैदराबाद, उन्नाव व आता उत्तर प्रदेशातील हाथरस येथे चार नराधमांनी निष्पाप मुलीचे शेतातून अपहरण करून सामूहिक बलात्कार केल्यानंतर पीडितेची जीभ छाटून, पाठीचा मणका मोडून तिच्याच ओढणीने तिचा गळा आवळून गळ्यात ३ फ्रॅक्चर करून जीवे ठार मारण्याचा प्रयत्न केले. पंधरा दिवस मृत्यूशी तिची झुंज अपयशी ठरली. घटनेच्या निषेध करून आरोपींना फाशीची शिक्षा व्हावी याकरिता आज सै. नियाज भैय्या फाउंडेशनतर्फे जिल्हाधिकारी कार्यालय याठिकाणी थाळीनाद आंदोलन करण्यात आले. यानंतर जिल्हाधिकारी अभिजित राऊत यांना निवेदन देऊन आरोपींना लवकरात लवकर फाशीची शिक्षा होण्यास व फक्त बलात्कार प्रकरणी मृत्यूदंडाची शिक्षा करण्याकरिता कायद्यात दुरुस्तीची मागणी करण्यात आली.
याप्रसंगी “फासी दो फासी दो गुन्हेगार को फासी दो, निर्भया के सन्मान में सभी भारतीय मैदान में, मुर्दाबाद मुर्दाबाद अत्याचारी मुर्दाबाद अशा घोषणा देण्यात आल्या. याप्रसंगी सै. नियाज अली भैय्या फॉउंडेशनचे सै. अयाज अली नियाज अली, शेख शफी, नाझीम पेंटर, सय्यद उमर, हाशिम कुरेशी, शेख झफर, झिशान हुसैन, शाकिब फारुख, तौसिफ कुरेशी, शेख सलीमुद्दिन, अश्फाख गफूर, आदी उपस्थित होते.
दरम्यान, अखिल भारतीय वाल्मिकी बहुपंचायत महाराष्ट्र प्रदेश जळगाव शाखेतर्फे जिल्हाधिकारी कार्यालयाबाहेर एकदिवसीय उपोषण करण्यात आले. यावेळी दिलीप चांगरे, वैशाली झाल्टे, जितेंद्र चांगरे, संजीव सनकत, राजेश चांगरे आदी यावेळी उपस्थित होते. तर दुसरीकडे जिल्हाधिकारी कार्यालयाच्या प्रांगणात भाजपा सोडून सर्वपक्षीय निषेध नोंदवण्यात आला. यात शिवसेनेचे गजानन मालपुरे, सरिता माळी , राष्ट्रवादी काँग्रेसचे वाल्मिक पाटील, कम्युनिस्ट पक्षाचे जे. डी . ठाकरे, काँग्रेसचे अमजद पठाण, मनसेचे दिलीप सुरवाडे, तसेच दिलीप सुरवाडे, मुकेश पांडे, यश जाधव, सचिन सोनार, आनंद सोनवल, सूर्यकिरण वाघ, जितेंद्र बागरे, ललित करोसिया, ललित शर्मा, जय ढंढोरे, हर्षल तेजकर उपस्थित होते.
राष्ट्रीय चर्मकार संघातर्फे देखील जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांना निवेदन देऊन दोषींवर कठोर कारवाई करणेबाबत पत्र दिले. यावेळी कार्याध्यक्ष भानुदास विसावे,पांडुरंग बाविस्कर, साहेबराव अहिरे, गणेश मोरे, विनोद खजुरे , प्रल्हाद विसावे, सुनील विसावे, बापू नेरकर,दीपक नेरकर, दीपक भारंबे आदी उपस्थित होते. दुपारी जमात ए इस्लामी हिंद महिला विभागातर्फे निवेदन देऊन दोषींवर कारवाई करण्याची मागणी करून घटनेचा निषेध करण्यात आला.







