जळगाव तालुक्यातील भादली खुर्द.येथील घटना
जळगाव (प्रतिनिधी) – तालुक्यातील भादली खुर्द. येथे रात्री कुलर सुर करण्यास गेले असता एकास इलेक्ट्रिक शाँक लागल्याने मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. याबाबत पोलीसात अकस्मात मृत्यूची नोद करण्यात आली आहे.
याबाबत सविस्तर माहिती असी की भादली खुर्द. येथे काल दि 30 रोजी रात्री 10 वाजेच्या सुमारास विद्युत पुरवठा खंडित झालेला असतांना अशोक हरचंद सोनवणे वय 45 व्यवसाय शेती हे अर्धा तासाने विद्युत पुरवठा सुरळीत झाल्यानंतर कुलर चालू करण्यासाठी गेले असता यावेळी जवळ असलेल्या लोखंडी खिडकीला हात लागला यावेळी खिडकी मध्ये करण उतरल्याने जोरदार विजेचा शॉक लागला ते खाली पडले. त्यांना उपचारासाठी जळगाव येथे दवाखान्यात नेत असतांना त्याचा मृत्यू झाला या प्रकरणी जळगाव तालुका पोलीस स्टेशनमध्ये अकस्मात मृत्यूची नोद करण्यात आली आहे
पुढील प्राथमिक तपास पो.हे.काँ. ईश्वर लोखडे करीत आहे. सोनवणे यांच्या पच्छात 2 मुली,पत्नी1 1भाऊ, 2 बहिण असा परिवार आहे सोनवणे हे शेतकरी होते त्यांच्या जाण्याने परिवारावर शोककळा पसरली आहे.