पारोळा ( प्रतिनिधी) – तहसील कार्यालयातील शिपाई डी. बी.बडगुजर हे रोजी सेवानिवृत्त झाले. त्यांनी महसूल विभागात तब्बल 38 वर्ष सेवा दिली.आपल्या मनमिळाऊ स्वभाव, चांगले व्यक्तीमत्व आणि आपल्या कर्तव्य प्रती असलेल्या निष्ठेमुळे त्यांनी महसूल कर्मचारी व अधिकाऱ्यांच्या मनात आपुलकीचे ऋणानुबंध निर्माण केले होते. त्यांच्या सेवा निवृत्तीच्या निमित्ताने महसूल कर्मचारी व तलाठी कर्मचारी यांचेकडून त्यांना भेटवस्तू देऊन, सत्कार करून, श्री. बडगुजर नानांना निरोप देण्यात आला. यावेळी तहसीलदार अनिल गवांदे पारोळा, शिंदे रावसाहेब नायब तहसिलदार, पंकज पाटील नायब तहसिलदार, जितेंद्र पाडवी नायब तहसीलदार व सर्व कर्मचारी व तलाठी वर्ग उपस्थित होते.








