चोपडा ( प्रतिनिधी )- येथील महात्मा गांधी शिक्षण मंडळ संचलित डाॅ. सुरेश जी. पाटील काॅलेज ऑफ नर्सिंग, चोपडा येथील अकाऊंटंट कम क्लॉर्क व प्रगतिशील शेतकरी राजेंद्र परशुराम पाटील, बहादरपूरकर यांच्या पत्नी सौ.अर्चना पाटील यांची रूद्र अपंग संघटना, वाशिम महाराष्ट्र राज्य या संघटनेच्या ‘ उत्तर महाराष्ट्र अध्यक्ष ‘ पदी दि. 26 सप्टेंबर 2020 रोजी निवड झाली.
ही निवड संघटनेचे संस्थापक अध्यक्ष संतोष व्यास,प्रदेश अध्यक्ष बाळाप्रसाद अग्रवाल, प्रभारी अध्यक्ष विष्णु सांगळे तसेच महाराष्ट्र उपाध्यक्ष रेणुका सोनवणे यांनी केली .या निवडीबद्दल सौ. अर्चना पाटील यांचे सर्व स्थरातून कौतुक होत आहे.
सौ अर्चना पाटील यानी यापूर्वी ही या संघटनेच्या तालुका अध्यक्ष म्हणून काम केले आहे त्यांचे काम पाहून संघटनेच्या पदाधिकारीनी पदोन्नती दिली आहे.