जळगाव (प्रतिनिधी) – शहरातील ३३ सामाजिक संघटना यांनी एकत्रित येऊन स्थापन केलेल्या जळगाव कोविंड केअर युनिटच्या वतीने डॉ. इमरान पठाण यांचा त्यांच्या कोरोना विषयक स्त्युत्य कार्यासाठी सत्कार करून गौरव करण्यात आला.

शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील अर्थातच कोविड हॉस्पिटल मधील प्रत्येक स्टाफ, डॉक्टर हे आपले कर्तव्य पार पाडीत आहेत. त्यातीलच मागील पाच महिन्यापासून सुट्टी न घेता कुटुंबाशी दूर राहून ,कोरोना रुग्णा सोबत राहून डॉ. इम्रान पठाण त्यांची सेवा करीत आहेत. शनिवारी २६ रोजी जळगाव कोविड केअर युनिट तर्फे युवाशक्तीचे अमित जगताप यांच्या हस्ते त्यांना गौरव करण्यात आले. त्यावेळी युनिटचे समन्वयक फारुक शेख, नोंदणी विभाग प्रमुख आमीर शेख, औषध वितरणचे वसीम शेख, अन्वर सिकलगर यांची उपस्थिती होती.







