चाळीसगाव ( प्रतिनिधी) – तालुक्यातील सायगाव येथे आज शनिवारी २६ रोजी दुपारी 4 वाजेच्या सुमारास पोहायला गेलेल्या तरुणाचा मन्याड धरणाच्या सांडव्यात खाली पडल्याने त्याचा मृत्यू झाल्याची घटना घडली. यामुळे गावावर शोककळा पसरली आहे.
सायगाव येथुन निसर्गरम्य मन्याड धरण असल्याने येथे फिरायला व पोहायला अनेक लोक ये- जा करतात. आज येथे सायगाव येथिल सागर सुदाम पाटील (वय 26) रा. सायगाव हा पोहायला गेला असता तो मन्याड धरणाच्या सांडव्यात वरतुन पडल्याने त्याच्या डोक्याला जबर मार लागला. यात तो मयत झाला असून याबाबत पोलीस चौकशी करीत आहे. सागर हा एकुलता एक मुलगा असल्याने खुप लाडाचा होता आणि त्याचा विहीर खोदकाम करण्याचा व्यवसाय होता. दुर्देवाची बाब म्हणजे लाँकडाऊन मध्ये त्याच्या वडिलांचा मृत्यू झाला होता. त्याच्या पश्चात आई, पत्नी, 1 मुलगा, 3 बहिणी आहे. याबाबत पुढील चौकशी पोलीस करीत आहे.