धनगर समाजाला आरक्षण मिळावे
यासाठी अनोखे आंदोलन
जळगाव (प्रतिनिधी) – धनगर समाजाला आरक्षण मिळावे यासाठी राज्यभरामध्ये शुक्रवारी दि. २५ रोजी विविध ठिकाणी आंदोलन करण्यात आले. जळगाव मध्येही जिल्हाधिकारी कार्यालयात समाजाच्या नागरिकांनी चक्क गुडघ्यावर रांगत जाऊन अप्पर जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन दिले.
धनगर समाजाच्या आरक्षणाचा मुद्दा पुन्हा ऐरणीवर आला आहे. या पार्श्वभूमीवर शुक्रवारी राज्यभरात धनगर समाजाच्यावतीने आंदोलन करण्यात आले. जळगावातही धनगर समाजाच्या वतीने चक्क मेंढ्या सारखे चालून अनोखे आंदोलन करण्यात आले. जिल्हाधिकारी कार्यालयाच्या आवारात व दालनातगुडघ्यावर रांगत जाऊन अप्पर जिल्हाधिकारी प्रवीण महाजन यांना निवेदन देण्यात आले.
निवेदन देतांना भरत येवस्कर, बाळासाहेब कंखरे ,चंद्रकांत श्रावणी ,धनराज देवरे, किरण साळुंखे, बंटी धनगर आदी उपस्थित होते. धनगर समाजाला एसटी आरक्षण द्यावे, आदिवासी समाजसारखं धनगर समाजाला देखील सवलती द्याव्या अशी मागणी यावेळी करण्यात आली.