जळगाव (प्रतिनिधी) – येथील शिवसेना महानगरतर्फे रेल्वे स्थानक परिसरात कोरोना आजाराच्या पार्श्वभूमीवर रेल्वे पोलिसांना गुरुवारी मास्क वाटप करण्यात आले. तसेच प्रवाशांसाठी मदत कक्षाद्वारे कोरोना आजाराविषयी तपासणी देखील करण्यात येत आहे. रेल्वेने दररोज हजारो प्रवासी ये-जा करतात. त्याकरिता रेल्वे पोलीस कर्तव्यावर असतात. प्रवाशांशी सतत त्यांचा संपर्क येत असतो. त्यामुळे गुरुवारी दूरक्षेत्र रेल्वे पोलीस, रेल्वे पोलीस फोर्सच्या अधिकारी, कर्मचार्यांना एकूण १३८ मास्कचे वाटप शिवसेना कार्यकर्त्यांनी केले.
यावेळी पोलीस निरीक्षक राजेंद्र झेंडे, विराज कावडिया, अमित जगताप उपस्थित होते. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या आदेशाने आणि संपर्क मंत्री संजय सावंत, पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री गुलाबराव पाटील, महानगर प्रमुख शरद तायडे यांच्या नेतृत्वाखाली हा उपक्रम सुरु आहे. यावेळी रेल्वेने ये-जा करणाऱ्या प्रवाशांना हात स्वच्छ धुण्यासाठी सॅनिटायझर उपलब्ध करून देण्यात आले आहेत. तसेच कोरोना तपासणी करण्यासाठी एक मशीन उभारण्यात आली असून बाहेरगावाहून येणाऱ्या प्रवाशांची तपासणी करण्यात येत आहे. जर शरीराचे तापमान 100 च्या वर जात असेल तर त्यांना तपासणी साठी पाठवले जात आहे. कोरोना आजार होऊ नये यासाठी मार्गदर्शन देखील केले जात आहे. यावेळी मनजीत जंगीड, तेजस दुसाने, पियुष हसवाल, सौरभ कुलकर्णी, पियुष तिवारी, मयूर जाधव, आकाश धनगर, जितेंद्र छाजेड, अजय मोरे, उमाकांत जाधव आदी परिश्रम घेत आहेत.