जळगाव (प्रतिनिधी) – राज्याचे युवासेना सचिव व कॉलेज कक्ष प्रमुख वरुण सरदेसाई यांच्या वाढ़दिवसानिमित्त मातोश्री वृद्धाश्रम, सावखेड़ा येथे धान्य व कॉस्मेटिक वस्तू भेट देण्यात आले.
करोनाच्या काळात सर्वत्र जीवन जगणे हलाखीचे झाले आहे. युवासेना प्रमुख़ व कॅबिनेट मंत्री आदित्य ठाकरे, पालकमंत्री गुलाबराव पाटील, संजय सावंत, समाधान पाटिल, गुलाबराव वाघ व शरद तायडे यांचे पुढाकाराने तसेच महाराष्ट्र राज्य विस्तारक कुणाल दराडे, किशोर भोंसले यांचे सहकार्यने हा उपक्रम घेण्यात आला.यावेळी मातोश्री वृद्धाश्रमाच्या कर्मचारी यांनी सांगितले की, तरुणांनी आई – वडिलांचे व गुरुजनांचे संस्कार विसरू नये. कोरोनाच्या काळात स्वतासह कुटुंबीयांची काळजी घ्यावी असेही ते म्हणाले. याप्रसंगी पीयूष गांधी (युवासेना उपजिलहा युवाअधिकारी जळगाव), रोहित शिरसाठ,महेश ठाकुर,जय मेहता, गुलाब कोळी, प्रशांत चौधरी, ललित अमोदकर व युवासैनिक उपस्थित होते.