जळगाव (प्रतिनिधी) – दीनदयाल उपाध्ये यांच्या पुण्यतिथीच्या प्रर्श्वभूमीवर प्रभाग क्र. २ मध्ये भाजपा नगरसेवक नवनाथ दारकुंडे यांनी कोरोना व डेंग्यूचा संसर्ग वाढू नये यासाठी स्वखर्चाने औषध फवारणी करण्यात आली.
प्रभाग क्रमांक २ मध्ये शिवाजी नगर मध्ये हमालवाड़ा परिसर, दवाखान्या मागील परिसर, केंद्र जवळील परिसर ,मिर्झा चौक ,जाफर चौक, बोहरी मज्जित, मकरा अपार्टमेंट, अमर चौक, शिव मंदिर जवळ, राजवाडा जवळ या परिसरात औषध फवारणी करण्यात आली. नगरसेवक नवनाथ दारकुंडे यांनी कार्यकर्त्यांसह औषधी फवारणी करून घेतली. यावेळी संजय अकोलकर, नाना गावडे व प्रभागातील नागरिक वर्ग उपस्थित होते.