जळगाव ( प्रतिनिधी) – महानगरपालिकाची महासभा आज बुधवारी 23 रोजी ऑनलाईन होणार आहे. यात स्थायी समितीचे सभापतींसह आठ सदस्य निवृत्त होणार आहेत. त्याकरिता नवीन सदस्यांची निवड केली जाणार आहे. तर महिला व बालकल्याण समितीच्या 9 सदस्यांची देखील निवड होणार आहे.
आता स्थायी समिती सभापती म्हणून अँड. शुचिता हाडा आहेत. त्यांच्यासह चेतन सनकत, भगत बालानी, सदाशिव ढेकळे, सुनील खडके, प्रवीण कोल्हे, अँड. दिलीप पोकळे, हे भाजपचे 7 तर शिवसेनेचे विष्णू भंगाळे निवृत्त होताहेत. तर उर्वरित भाजपचे राजेंद्र घुगे पाटील, रेश्मा काळे, मुकुंद सोनवणे, प्रतिभा देशमुख, नवनाथ दारकुंडे, शिवसेनेचे नितीन बरडे, नितीन लढ्ढा, एमआयएम पक्षाचे सईदा बी हे 8 सदस्य स्थायित कायम आहेत.
नवीन सदस्यांची निवड आज बुधवारी दुपारी सुमारे 12 वाजेला होईल. यात शिवसेनेतर्फे प्रशांत नाईक यांचे नाव जवळपास निश्चित झाले आहे. भाजप बंद लिफाफ्यात त्यांची 7 नावे देणार आहेत. मात्र भाजपच्या 7 जणांच्या या संभाव्य यादीत उज्वला बेंडाळे, ज्योती सोनवणे, ललित कोल्हे, विरेंन खडके, कुलभूषण पाटील, अमित काळे, सुरेश सोनवणे, डॉ. चंद्रशेखर पाटील यांच्यापैकी नावे असण्याची चर्चा भाजपच्या गोटात सुरू आहे. तर निवृत्त झालेले भगत बालानी, सुनील खडके, सदाशिव ढेकळे यांची देखील पुनर्निवड होऊ शकते.