जळगाव (प्रतिनिधी) – शरद जोशी प्रणीत शेतकरी संघटनेचे जिल्हाधकारी यांना निवेदन देण्यात आले. गेल्या १४ सप्टेबर पासून केंद्रसरकारने कांदा निर्यात बंद केलेली असून हा निर्णय शेतकरी व सार्वसामान्यांच्या विरोधात आहे.सद्या कोरोनाच्या पार्श्वभूमीवर शेतकरी हा हवालदिल झालेला असताना हा निर्णय म्हणजे दुष्काळात तेरावा महिना येणे, असे झाले आहे
आंतरराष्ट्रीय बाज़ारपेठेत कांद्याला योग्य भाव असून शेतकऱ्यांसोबत देशाला ही याचा मोठा आर्थिक फ़ायदाच होणार आहे,देशाचे आर्थिक महसूल वाढनार आहे.सरकारने कांदा निर्यात पुन्हा सुरु करावी,कांदयाचे दर हे स्थिर ठेवावे, आडते ,दलाल व व्यापारी यांच्यापासून शेतकऱ्यांना आर्थिक सरंक्षण द्यावे इ. मागण्या या निवेदनात संघटनेमार्फत करण्यात आल्यात,याप्रसंगी –
अध्यक्ष विठ्ठलराजे पवार, उपाध्यक्ष डॉ महेंद्र काबरा, डॉ.सौ.काबरा, मालती प्रकाश पाटील, डाँ.गजेंद्र पाटील,सौ.लता सुरेशराव पाटील, अँड.विलासजी मोरे, प्रमोद राठोड यांची उपस्थिती होती.